agricultural stories in Marathi, agrovision, Fish can recognize themselves in the mirror | Agrowon

मासे ओळखू शकतात आरशातील आपली प्रतिमा
वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

आरशातील आपली प्रतिमा न्याहाळण्याचे कौतुक केवळ मानवामध्येच नाही, तर अन्य बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या सजीवांमध्येही दिसून येते. आरशातील आपली प्रतिमा ओळखण्याची क्षमता माशांमध्ये असल्याचे संशोधनात आढळले आहे. या गोष्टीवरून माशांच्या बुद्धिमत्तेविषयी मानवाला अनेक गोष्टी अद्याप ज्ञात नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

आरशातील आपली प्रतिमा न्याहाळण्याचे कौतुक केवळ मानवामध्येच नाही, तर अन्य बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या सजीवांमध्येही दिसून येते. आरशातील आपली प्रतिमा ओळखण्याची क्षमता माशांमध्ये असल्याचे संशोधनात आढळले आहे. या गोष्टीवरून माशांच्या बुद्धिमत्तेविषयी मानवाला अनेक गोष्टी अद्याप ज्ञात नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

आरशातील आपली प्रतिमा ओळखणे ही बाब मानसशास्त्र किंवा बुद्धिमत्तेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ती स्वतःविषयी जाणीव असल्याची खूण मानतात. यामुळे १९७० मध्ये मानसशास्त्रज्ञ गोर्डन गॅल्लप ज्यू. यांनी विकसित केलेली आरसा चाचणी ही वर्तणूकशास्त्रात महत्त्वाची ठरते. प्राण्यांसमोर त्याची प्रतिकृती ठेवून याबाबत पहिली चाचणी घेतली जाते. त्याच्या प्रतिसादानुसार आरशासमोर चाचणी घेतात. जे काही प्राणी ही चाचणी उत्तीर्ण होतात, त्यांची गणना हुशार या सदरात होते. उदा. माकडांमध्ये चिंपाझी, बोनोबो आणि डॉल्फिन, हत्ती इ.
पक्ष्यांमध्ये कबुतरांनंतर मॅगपीज या एका पक्ष्याने नुकतीच ही चाचणी उत्तीर्ण केली आहे. काही मुंग्या या चाचणीतून पुढे जात असल्या तरी माशांच्या क्लिनर व्रॅस्से (शा. नाव - Labroides dimidiatus) या प्रजातीने हे आव्हान पार केले आहे. या माशांनी प्रतिमेकडे पाहून शरीरावरील खूणा साफ करण्याचा प्रयत्न चाचणीमध्ये केला. ही बाब २०१८ मध्ये आढळली असली तरी अधिक अभ्यासानंतर आता सिद्ध करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना संशोधक डॉ. अलेक्स जॉर्डन यांनी सांगितले, की माशांच्या वर्तनामध्ये आम्हाला ही बाब प्रथम आढळल्यानंतर किचिंत शंका होती. त्यामुळे अधिक चाचण्या घेत खात्री करण्यात आली. अर्थात, केवळ यावरून माशांमध्ये स्वतःविषयी काही जाणीव असल्याचा निष्कर्ष घाईने काढता येणार नाही. त्यासाठी त्यांना अन्य प्राण्यांप्रमाणे अधिक चाचण्या पार कराव्या लागतील.
हे संशोधन ‘प्लॉस बायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
 

 

इतर बातम्या
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...