agricultural stories in Marathi, agrovision, Keeping the taste, reducing the salt | Agrowon

मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी खास ब्लेंड्स
वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

जेवणामध्ये चवीसाठी मीठ आवश्यक असले तरी त्याचे अधिक प्रमाण हे आरोग्यासाठी फारसे चांगले नसल्याचे सातत्याने पुढे येत असते. मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईडचे प्रमाण करण्यासाठी वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधकांनी नवा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी चवीमध्ये फारसा फरक न पडता व मिठाला पर्यायी ठरतील असे ब्लेंड्स तयार केले आहेत.

जेवणामध्ये चवीसाठी मीठ आवश्यक असले तरी त्याचे अधिक प्रमाण हे आरोग्यासाठी फारसे चांगले नसल्याचे सातत्याने पुढे येत असते. मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईडचे प्रमाण करण्यासाठी वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधकांनी नवा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी चवीमध्ये फारसा फरक न पडता व मिठाला पर्यायी ठरतील असे ब्लेंड्स तयार केले आहेत.

वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील अन्नशास्त्र विभागातील प्रो. कॅरोलिन रोस यांनी सांगितले, की कमी मिठाचे पदार्थ खाण्याची सूचना असली तरी चव आणि स्वाद कमी होत असल्यामुळे अशा खाद्याला सामान्यांकडून प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे पदार्थांची चव कायम ठेवतानाच त्यातील मिठाचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान अन्नशास्त्राच्या समोर आहे. रोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोडियम क्लोराईडचा वापर कमी करून अन्य कॅल्शिअम क्लोराईड, पोटॅशिअम क्लोराईड अशा घटकांचा वापर करून खारट स्वादाची मिश्रणे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ फूड सायन्स’ मध्ये प्रकाशित केले आहेत.

खारटपणा आणण्यासाठी...

  •  नव्याने तयार करण्यात आलेल्या दोन्ही घटकांचे आरोग्यावर कोणतेही विपरीत परिणाम होत नसल्याचे रॉस यांनी सांगितले. उलट पोटॅशिअम हे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, ते फारसे चवदार नाही. पोटॅशिअम क्लोराईडला काहीशी कडसर चव असते.
  •  या नव्या मिश्रणापासून तयार केलेल्या मिश्रणांच्या चवी घेण्यासाठी टेस्टिंग पॅनेलसोबतच इलेक्ट्रॉनिक जिभेचाही वापर करण्यात आला. सध्या वापरल्या जाणाऱ्या मिठाला योग्य असा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात केवळ मिठाचे पाणी आणि विविध मिश्रणासह टोमॅटो सूप चाखण्यात आले.
  •  इलेक्ट्रॉनिक जिभ आणि पॅनेलवरील व्यक्तींच्या साह्याने मिळवलेल्या मिश्रणामध्ये अंदाजे ९६.४ टक्के सोडियम क्लोराईड, १.६ टक्के पोटॅशिअम क्लोराईड आणि दोन टक्के कॅल्शिअम क्लोराईड असे आदर्श प्रमाण मिळाले.
  •  अधिक प्रमाणात सोडियम क्लोराईड (७८ टक्के) कमी करण्यासाठी केवळ कॅल्शिअम क्लोराईडचा वापर करण्यासाठी त्याचे प्रमाण २२ टक्के ठेवावे लागते.  
  •  या दोन मीठ मिश्रणामुळे एकूण १०० टक्के सोडियम क्लोराईडच्या तुलनेमध्ये फार फरक पडला नाही. मात्र, ज्या वेळी त्यामध्ये पोटॅशियम क्लोराईड टाकले त्या वेळी त्याच ग्राह्यता एकदम कमी झाली.

मिठाची गरज आणि कमी करण्याचे तंत्र

  • आरोग्यासाठी माणसांना मिठाची गरज असली तरी अमेरिकन लोकांच्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण हे आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याचे अमेरिकन रोग प्रतिबंधक आणि आरोग्य प्रोत्साहन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात येते. त्यांच्या मते प्रतिदिन कमाल २३०० मिलीग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्यात असले पाहिजे. सध्या सरासरी अमेरिकन महिलांच्या आहारात प्रतिदिन २९८० मिलीग्रॅम इतके, तर अमेरिकन पुरुषाच्या आहारात प्रतिदिन ४ हजार मिलिग्रॅम इतके मिठाचे प्रमाण आहे. मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी दीर्घकाळामध्ये सावकाश कमी कमी प्रमाणामध्ये घट करत राहणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात मीठ कमी करण्यासाठी आहारशास्त्राने काही पावले उचलली आहेत. ती उपयुक्त ठरतील.

 

इतर बातम्या
रिसोड बाजार समितीच्या सभापतिपदी सुमन...वाशीम : जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
ढाकणी पाणी भरणा केंद्र अत्यवस्थदहिवडी, जि. सातारा : दुष्काळाची दाहकता गंभीर रूप...
राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड...नगर ः ‘‘राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड...
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
शेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर...नाशिक :  ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढलासांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
लातूर विभागात होणार चौदाशे शेतीशाळालातूर ः या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर...