दिव्यांगांसाठी स्वयंचलित सांगाडा

दिव्यांगांसाठी स्वयंचलित सांगाडा
दिव्यांगांसाठी स्वयंचलित सांगाडा

सर्वसामान्यांच्या तुलनेमध्ये दिव्यांगाच्या समस्यांची तीव्रताही अधिक असते. सर्वसामान्यांना अगदी साध्या वाटणाऱ्या पायऱ्या, कठडेही चढण्यामध्ये त्यांना अडचणी येतात. अशा लोकांसाठी स्वित्झर्लंड येथील दी स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील अभियंत्यांनी दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर स्वयंचलित सांगाडा बनवला आहे. त्याचे नाव ट्वाईस ऑन असे ठेवण्यात आले आहे. हा स्वयंचलित सांगाडा परिधान करून स्विस जर्मन येथील जन्मजात अपंगत्व असलेल्या सिल्के पॅन या सहजतेने पायऱ्या चढताना छायाचित्रात दिसत आहे. त्या मुळात अॅथलिट असून, दिव्यांगाच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात. आता दिव्यांगाना कोणाचीही मदत न घेता आपली सर्व कामे कार्यक्षमतेने करणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com