agricultural stories in Marathi, agrovision, Pests and the plant defenses against them drive diversity in tropical rainforests | Agrowon

वर्षावनातील विविधतेसाठी किडी, वनस्पतीतील संरक्षण यंत्रणा कारणीभूत
वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने नेहमीच भुरळ घातली आहे. दोन फूटबॉलएवढ्या क्षेत्रफळामध्ये ६५० विविध झाडांच्या प्रजाती एकत्र नांदत असतात. त्यातही एक सारख्या वनस्पती एकमेकांच्या जवळ अजिबात वाढत नाहीत. आपले शेजारी वेगळे निवडण्याचा तर प्रकार नसावा, याबाबत उतह विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला आहे.

संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने नेहमीच भुरळ घातली आहे. दोन फूटबॉलएवढ्या क्षेत्रफळामध्ये ६५० विविध झाडांच्या प्रजाती एकत्र नांदत असतात. त्यातही एक सारख्या वनस्पती एकमेकांच्या जवळ अजिबात वाढत नाहीत. आपले शेजारी वेगळे निवडण्याचा तर प्रकार नसावा, याबाबत उतह विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला आहे.

वाढीसाठी वर्षावनामध्ये सातत्याने एक युद्ध सुरू असते. वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी झगडत असतात. एकासारख्या झाडांच्या प्रजाती एकाच प्रकारे स्रोतांसाठी प्रयत्न करत असल्याने एकमेकांच्या वाढीवर परिणाम होतो. वनस्पतींचे दुसरे युद्ध सुरू असते ते म्हणजे पाने खाणाऱ्या किडींशी. एकाच प्रकारच्या झाडावर किडी आणि रोगांचा प्रकारही सारखाच असतो. त्यामुळे एका झाडावर प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा प्रसार वेगाने अन्य झाडांपर्यंत होतो. त्यामुळे संशोधकांच्या समोर प्रश्न उभा राहिला की वर्षावनातील विविधता ही स्पर्धेमुळे असते की रोगकिडींमुळे? उतह विद्यापीठातील संशोधकांनी एका प्रयोगामध्ये दोन्ही यंत्रणाची तुलना केली.

संशोधक गटाने शेजारच्या झाडांमुळे वाढीवरील परिणामासोबतच शेजारच्या नऊ प्रजातींच्या इंगा जातीच्या झाडांवर होणारे परिणामांचे विश्लेषण केले. त्यात झाडांकडून स्रोत मिळवण्याचे गुणधर्म, पाने खाणाऱ्या किंडीविरुद्धची संरक्षण प्रणाली आणि त्या झाडावर राहणाऱ्या किडींची तुलना केली.
त्यातून संरक्षण गुणधर्म आणि किडीच्या प्रसारांचा वाढीवर आणि तग धरण्यावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून आले. त्या तुलनेमध्ये स्रोत मिळवण्यासाठीचे गुणधर्मांचा वनस्पतींच्या यशावर काही परिणाम दिसून आला नाही. याचाच अर्थ किडींच्या संख्येवर परिणाम करणारे कोणतेही घटक उदा. वातावरणातील बदल किंवा रहिवासाचे तुकडे होणे यांचा परिणाम वर्षावनांच्या आरोग्यावर पडणार आहे.

उतह विद्यापीठातील जैवशास्त्र महाविद्यालयातील संशोधक डेल फॉरिस्टर यांनी सांगितले, की वनस्पतींच्या प्रजाती एकमेकांवर किती गुंतागुंतीच्या पद्धतीने अवलंबून असतात, याविषयी समजून आले. कोणतीही प्रजाती ही एकटी, वेगळी जगू शकत नाही. मौल्यवान अशा स्रोंतासाठी एकमेकांशी प्रत्येक पातळीवर स्पर्धा करावी लागते. बाह्य शत्रूपासून संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. त्यातून एकमेकाशी संबंध निर्माण होतात, त्याचा परिणाम वर्षावनातील विविधतेवर होत असतो.
हे संशोधन दी जर्नल सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

असा झाला अभ्यास

  • पनामा येथील बॅरो कोलोरॅडो बेटावरील जंगलाच्या ५० हेक्टर क्षेत्रामध्ये पाच वर्षांसाठी विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला. या स्थानावरील सुमारे ४.२३ लाख झाडांच्या वाढीचा आणि तग धरण्याचा विस्तृत माहिता साठा पूर्वीपासून केलेल्या अभ्यासामुळे उपलब्ध आहे.
  • संशोधकांनी त्यातील फोकल इंगा प्रजातीच्या प्रत्येक झाडाचे व त्याच्या शेजारी १० मीटर अंतरात असलेल्या प्रजातींतील साम्यांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये सूर्यप्रकाश, पाणी अशा सुमारे चार स्रोतांचे मापन केले तर पाने खाणाऱ्या किडींपासून संरक्षणाच्या पाच गुणधर्मांचे मोजमाप केले. त्याच प्रमाणे त्यावर येणाऱ्या पाणी खाणाऱ्या किडींची संख्या मोजण्यात आली.
  • शेजारील झाडांचा झाडांच्या वाढीवर आणि तग धरण्यावर होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेण्यासाठी फॉर्रिस्टेर यांनी एक गुंतागुंतीचे प्रारूप तयार केले आहे.
  • अन्नद्रव्ये किंवा अन्य स्रोत मिळवण्यासाठीच्या गुणधर्मांचा तग धरण्यावर काही परिणाम होत नसल्याचे दिसून आले. त्याच वेळी संरक्षणात्मक गुणधर्म आणि पाने खाणाऱ्या किडींचा मोठा परिणाम होतो.
  • वास्तविक झाडांसाठी विविध उपयुक्त घटक मिळवण्याचे स्रोत मर्यादीत असतात. त्या तुलनेमध्ये संरक्षणाचे गुणधर्म अधिक प्रमाणात असतात. किडी आणि वनस्पती यांच्यामध्ये सातत्याने एक लढाई सुरू असते. भुकेल्या किडींना दूर ठेवण्यासाठी अनेक उपाय वनस्पतींकडून राबवले जातात. त्यावर उपायांशी जुळवून घेऊन किंवा अन्य प्रकारे मात करण्याचे प्रयत्न किडींकडून सातत्याने होत असतात.
  • इंगा झाडांच्या प्रजातीमध्ये संरक्षणाचे विविध उपाय आढळतात. त्यांच्या पानांवर लहान लव असते. मधाचे कपाकडे भक्ष्यकांना रोखणाऱ्या मुंग्या आकर्षित होतात. पानांमद्ये विषारी संयुगे भरलेली असतात. प्रत्येक इंगा प्रजाती शेकडो किंवा काही वेळेस हजारो वेगवेगळी विषारी द्रव्ये बनवू शकतात.

प्रो. फिल्लिस कोले यांनी सांगितले की, सामान्यपणे आपल्याला जंगलामध्ये पानांवर किडींचे साम्राज्य पसरले असेल, असेच वाटत असते. मात्र, वनस्पतींकडेही अगणित संरक्षण प्रणाली असतात. कोवळ्या पानांवर किडींचा जास्त हल्ला होतो, त्या वेळी अशा पानांमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक विषारी घटक भरलेले असतात. अशा कारणामुळे पाने खाणाऱ्या किडींची प्रत्येक प्रजाती ही केवळ काही प्रकारच्याच वनस्पती खाऊ शकते.
अत्यंत जवळच्या असलेल्या वनस्पतींमध्ये समान संरक्षण गुणधर्म असतात. त्यामुळे त्यावर समान किडी असतात. जर वनस्पतींच्या शेजारच्या वनस्पतींचे संरक्षण गुणधर्म वेगळे असल्यास त्यांना पाने खाणाऱ्या किडींचा धोका राहत नाही.

रासायनिक घटकांचे भांडार

  • वनस्पतीत विषारी घटकांचे प्रमाण मोठे असते. पाच वर्षामध्ये संशोधकांनी पानांचे नमुने घेऊन, एका सुटकेसमध्ये वाळवून त्यांचे विश्लेषण केले. लिक्विड क्रोमॅटोग्राफी तंत्राने त्यातील प्रत्येक संयुग वेगळे करण्यात आले. आतापर्यंत केवळ ४ टक्के इंगा संयुगेच शास्त्राला माहीत आहेत.
  • संशोधकांना मास स्पेक्ट्रोमीटरची वापर करून प्रत्येक संयुगाची रासायनिक संरचना ठरवली.

इतर अॅग्रो विशेष
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...