agricultural stories in Marathi, agrovision, Plant-scraps-key-component-in-cheap-sustainable-jet-fuel | Agrowon

वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई इंधनाची निर्मिती
मंगळवार, 26 मार्च 2019

पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून उत्तम दर्जाचे उच्च घनतेचे हवाई इंधन तयार करण्यात चीन येथील संशोधकांना यश आले आहे. या वनस्पतीजन्य इंधनामध्ये पर्यावरणात विमाने आणि रॉकेट यांच्या उड्डाणामुळे होणारे कार्बन डाय ऑक्साईडचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ ज्यूल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून उत्तम दर्जाचे उच्च घनतेचे हवाई इंधन तयार करण्यात चीन येथील संशोधकांना यश आले आहे. या वनस्पतीजन्य इंधनामध्ये पर्यावरणात विमाने आणि रॉकेट यांच्या उड्डाणामुळे होणारे कार्बन डाय ऑक्साईडचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ ज्यूल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जैवइंधनाचा मुख्य घटक सेल्युलोज असतो. तो स्वस्त, पुनर्वापरयोग्य असून, वनस्पती पेशीच्या भित्तिकांमध्ये असतो. त्यातील जेट इंधनामध्ये वापरली जाणारी अल्केन्स (उदा. ऑक्टेन, डोडेकेन आणि हेक्साडिकेन) वेगळी करण्यात यापूर्वीच यश आले आहे. मात्र, त्याहीपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या पॉलिसायक्लोअल्केन संयुगांच्या निर्मिती शक्य होऊ शकते, असा विश्वास संशोधकांना आहे. ही संयुगे हवाई इंधनामध्ये वापरली जातात. त्याविषयी माहिती देताना संशोधन निंग ली यांनी सांगितले, की कर्बवायूंच्या उत्सर्जनाच्या समस्येवर मात करण्यामध्ये जैवइंधन मोलाचे ठरणार आहेत. पारंपरिक हवाई इंधनाच्या तुलनेमध्ये बायोमासपासून मिळवलेले इंधन हे अधिक घनतेचे असणार आहे. त्यामुळे इंधनाचे आकारमान सारखेच राहिले तरी वजनामध्ये वाढ होऊ शकते.
- या इंधनाच्या निर्मितीसाठी संशोधकांनी सेल्युलोजचे निवडकपणे हेक्सानेडिओनमध्ये रुपांतर केले. त्यानंतर संयुगे वेगळी करण्याची पद्धत अवलंबली.
- जैवइंधनाची खरी जादू हे त्याच्या उच्च घनतेमध्ये असून, त्यामुळे इंधनाची कार्यक्षमता वाढणार आहे. त्यामुळे विमाने अधिक अंतर कापू शकतील आणि अधिक वजनही नेऊ शकतील. पर्यायाने फेऱ्यांची संख्या कमी होऊन, कर्ब उत्सर्जनामध्ये घट होईल. विशेषतः उड्डाणावेळी आणि जमिनीवर येताना त्याचा फायदा होईल.

  • सध्या केवळ प्रयोगशाळेमध्ये चाचणीदरम्यान इंधन तयार केले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया अत्यंत स्वस्त राहू शकेल, अशा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला. पारंपरिक हवाई इंधनाच्या निर्मिती आणि वापरापेक्षा यातील खर्च कमी असेल. पर्यायाने अधिक नफा मिळाल्याने व्यावसायिक वापरासाठी अडचणी येणार नाहीत.
  • सेल्युलोजचे २, ५ हेक्सानेडियॉन मध्ये विघटन करण्याच्या प्रक्रियेमध्ये डाक्लोकोमिथेनचा वापर होतो. हा घटक रंग काढण्यातील द्रावणात वापरला जात असून, तो पर्यावरण आणि आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. फक्त या अडचणीवर मात करावी लागेल.
टॅग्स

इतर बातम्या
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
रिसोड बाजार समितीच्या सभापतिपदी सुमन...वाशीम : जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
ढाकणी पाणी भरणा केंद्र अत्यवस्थदहिवडी, जि. सातारा : दुष्काळाची दाहकता गंभीर रूप...
राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड...नगर ः ‘‘राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड...
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...