agricultural stories in Marathi, agrovision, Soy protein lowers cholesterol, study suggests | Agrowon

हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया प्रथिने वगळणार
वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी आरोग्यदायी अन्नांच्या यादीतून सोया प्रथिने काढून टाकण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सोयाबीन उत्पादनासंबंधी सध्या उपलब्ध असलेल्या ४६ संशोधन चाचण्यांच्या पुनर्विश्लेषणाचा आधार त्यांनी घेतला आहे. मात्र, अनेक संशोधक या धोरणासाठी प्रशासनावर टीका करीत आहेत.

अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी आरोग्यदायी अन्नांच्या यादीतून सोया प्रथिने काढून टाकण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सोयाबीन उत्पादनासंबंधी सध्या उपलब्ध असलेल्या ४६ संशोधन चाचण्यांच्या पुनर्विश्लेषणाचा आधार त्यांनी घेतला आहे. मात्र, अनेक संशोधक या धोरणासाठी प्रशासनावर टीका करीत आहेत.

टोरॅंटो येथील सेंट मायकेल हॉस्पिटलमधील संशोधनामध्ये सोया प्रथिनांची कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता कमी तरूही लक्षणीय असल्याचे मांडले होते. अशाच प्रकारे विविध ठिकाणी झालेल्या ४६ संशोधन चाचण्यांपैकी ४३ मधून मिळालेल्या माहिती आणि निष्कर्षांचे पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यातील ४१ चाचण्यांमध्ये सोया प्रथिनांचे कमी घनतेच्या लोपिप्रोटीन (एलडीएल) कोलेस्टेरॉल (हे वाईट कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते.) वरील परिणामांचा अभ्यास केला होता. रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाविषयीची माहिती या सर्व संशोधनातून मांडण्यात आली आहे.

क्लिनिकल न्यूट्रिशन अॅण्ड रिक्स फॅक्टर मॉडिफिकेशन सेंटरचे संचालक डॉ. डेव्हिड जेन्किन्स यांच्या संशोधनानुसार, सोया प्रथिनांमुळे एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण प्रौढांमध्ये ३ ते ४ टक्के कमी होते. हे प्रमाण कमी वाटत असले, तरी लक्षणीय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या आहारातील अधिक संपृक्त मेद आणि कोलेस्टेरॉलयुक्त मांसाऐवजी सोया प्रथिनांचा वापर करू लागते, त्या वेळी कोलेस्टेरॉलचे प्रमाण लक्षणीय कमी होते. सध्याच्या माहिती आणि आमच्या विश्लेषणानुसार सोया प्रथिने ही हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

असे असूनही विविध ४६ संशोधनांतील माहिती आणि निष्कर्षानुसार अन्न आणि औषध प्रशासन सोया प्रथिने या यादीतून वगळण्याचा निर्णय घेत आहे. वास्तविक, वनस्पतीजन्य आहार हा एकूणच आरोग्यासाठी चांगला असून, लोक त्याचा वापर सुरू ठेवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. कॅनडा येथील आरोग्य विभागाने यासाठी तशा मार्गदर्शक सूचनाही प्रसारित केल्या आहेत.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...