agricultural stories in Marathi, agrovision, Unique composition of Indian gut microbiome revealed | Agrowon

भारतीयांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म
वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत जीवाणूच्या समूहाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मिळविण्यात भोपाळ येथील भारतीय शास्त्र शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संशोधकांना यश आले आहे. त्यांनी मध्य प्रदेश आणि केरळ येथील १०० आरोग्यपूर्ण व्यक्तींच्या नमुन्यांचे विश्लेषण केले असून, त्याचा जनुकीय कॅटलॉग तयार केला आहे. यासाठी विविध अत्याधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर केला असून, कॅटलॉगमध्ये पचनसंस्थेतील जीवाणूंच्या जनुकांची संरचना मिळवण्यात आली आहे. यामुळे जीवाणूंद्वारे पचनसंस्थेमध्ये पार पाडण्यात आलेल्या कामांविषयी अधिक सखोल माहिती मिळू शकेल.

भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत जीवाणूच्या समूहाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मिळविण्यात भोपाळ येथील भारतीय शास्त्र शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संशोधकांना यश आले आहे. त्यांनी मध्य प्रदेश आणि केरळ येथील १०० आरोग्यपूर्ण व्यक्तींच्या नमुन्यांचे विश्लेषण केले असून, त्याचा जनुकीय कॅटलॉग तयार केला आहे. यासाठी विविध अत्याधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर केला असून, कॅटलॉगमध्ये पचनसंस्थेतील जीवाणूंच्या जनुकांची संरचना मिळवण्यात आली आहे. यामुळे जीवाणूंद्वारे पचनसंस्थेमध्ये पार पाडण्यात आलेल्या कामांविषयी अधिक सखोल माहिती मिळू शकेल. हे संशोधन ‘गीगासायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

तुलनात्मक विश्लेषण

भारतीय लोकांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांची तुलना चीन, अमेरिकी आणि डेन्मार्क येथील लोकांमधील जीवाणूंशी करण्यात आली. त्यात अन्य लोकांच्या तुलनेमध्ये भारतीय लोकांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांमध्ये प्रेव्होटेल्ला जीवाणूंची पातळी सर्वोच्च आढळली. त्याविषयी माहिती देताना संस्थेतील जैवशास्त्र विभागाच्या प्रो. विनित के. शर्मा यांनी सांगितले, की भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये आढळणाऱ्या वेगळ्या सूक्ष्मजीवांच्या प्रजातीमागे वेगळ्या खाद्य सवयी आणि आहार कारणीभूत आहे. भारतीयांच्या खाद्यसवयी पाश्चिमात्यांच्या तुलनेमध्ये प्रचंड वेगळ्या आहेत.

असा झाला अभ्यास

मध्य प्रदेशातील ५३ लोक आणि केरळ येथील ५७ लोकांच्या विष्ठेच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून सूक्ष्मजीवांची यादी बनवण्यात आली. या यादीमध्ये १,५५१,५८१ इतकी जनुके आढळली. त्यातील ९४३,३९५ जनुकांची ओळख भारतीयांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणून करण्यात आली. एकूण जनुकांच्या सुमारे ९ टक्के (सुमारे दहा लाख) इतकी जनुके वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ती जगातील अन्य कोणत्याही लोकांमध्ये आढळत नाहीत, असे प्रो. शर्मा यांनी सांगितले.

या अभ्यासामध्ये दोन राज्यातील लोकांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या संरचनेतील फरकांवरही लक्ष केंद्रित केले होते. केरळ येथील नमुन्यांमध्ये शार्टचेन फॅटी आम्लांची निर्मिती करणाऱ्या जीवाणूंचा उदा. Faecalibacterium आणि Roseburia) यांची संख्या प्रेव्होटेल्ला जीवाणूंसोबत अधिक असल्याचे दिसून आले आहे. यामागे केरळ येथील आहारामध्ये प्राधान्याने भात, मासे आणि मांसाहाराचा समावेश असतो.
प्रेव्होटेल्ला ही भारतीय लोकांतील वैशिट्यपूर्ण प्रजाती मध्य प्रदेशातील लोकांमध्ये तुलनात्मक अधिक आढळली. या गटातील लोक बहुतांशी वनस्पतीजन्य आहार करणारे होते. त्यांच्यामध्ये बहुशाखीय साखळ्या असलेली अमिनो आम्ले आणि लिपोपॉलिसॅकराईड जैव मार्गिका आढळल्या.

असे होतील फायदे ः

  • पचनसंस्थेमध्ये सूक्ष्मजीवांच्या एकूण चयापचयाच्या प्रक्रियेअंती निर्माण होणाऱ्या घटकांना फेस्कल मेटाबोलिटिक्स म्हणतात. भारतीय नमुन्यांमध्ये असे अनेक मेटाबोलिटिक्स ओळखण्यात आले असून, त्यांचे विविध सूक्ष्मजीवांच्या प्रजातीशी असलेले संबंधाचे नकाशे बनवले आहेत.
  • या संशोधनाचे संशोधक दर्शन धाकन यांनी सांगितले, की जर आपल्याकडे विष्ठेतील मेटाबोलिटिक्सची माहिती उपलब्ध झाली तर त्यांच्या तुलनांतून त्यात घडलेले नेमके बदल मिळवणे शक्य होणार आहे. या संशोधनाच्या निष्कर्षातून भारतील लोकांच्या गरजेनुसार वेगळ्या अशा प्री आणि प्रोबायोटिक्स उत्पादनांनी निर्मिती करण्यासाठी चालना मिळणार आहे.
  • धाकन यांच्या मते, अमेरिकेमध्ये विकसित केलेले आणि चाचण्या घेतलेले औषध भारतील लोकांसाठी चांगले काम करू शकेलच असे नाही. त्यामुळे पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांविषयी नेमकी माहिती उपयुक्त ठरणार आहे. त्यातून भारतीय लोकांसाठी योग्य अशी औषधे विकसित करण्याचे धोरण आखता येईल. त्याचप्रमाणे सूक्ष्जीवांच्या असंतुलनातून उद्भवणाऱ्या पचनसंस्थेच्या आजारांवरही उपाय करणे शक्य होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...