agricultural stories in Marathi, agrovision, Unraveling of ५८-year-old corn gene mystery may have plant-breeding implications | Agrowon

मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडले
वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

मक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या दाण्याची निर्मिती कशी होते, याची ५८ वर्षांपासून संशोधकांनी भेडसावणारे गूढ उलगडण्यात यश आले आहे. मक्यातील एक म्युटंट जनुक अन्य जनुकांना कार्यान्वित करत असल्याने मक्याचे दाणे लाल होण्याची प्रक्रिया घडत असल्याचे दिसून आले आहे.

मक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या दाण्याची निर्मिती कशी होते, याची ५८ वर्षांपासून संशोधकांनी भेडसावणारे गूढ उलगडण्यात यश आले आहे. मक्यातील एक म्युटंट जनुक अन्य जनुकांना कार्यान्वित करत असल्याने मक्याचे दाणे लाल होण्याची प्रक्रिया घडत असल्याचे दिसून आले आहे.

पेन्न राज्य विद्यापीठातील मका जनुकशास्त्राचे प्रो. सुरिंदर चोप्रा हे १९९७ पासून मक्यातील लाल रंग उत्पन्न होण्यामागील कारणांचा शोध घेत आहेत. पहिल्यांदा आयोवा राज्य विद्यापीठामध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधनाच्या वेळी त्यांना असा लाल होणाऱ्या मक्यांचे बियाणे मिळाले. यामध्ये अचानकपणे होणाऱ्या जनुकांच्या म्युटेशनमुळे लाल रंगद्रव्यांची निर्मिती होते. ती कणसे, कोंब, काड इतकेच पण मक्याच्या दाण्याभोवती असलेल्या केसामध्येही असतात. मात्र, हे गुणधर्म काही पिढ्यानंतर आपोआप लुप्त होतात. तसे पाहता ही समस्या अत्यंत लहान वाटत असली तरी वनस्पती जीवशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत परिणामकारक आहे. त्याविषयी माहिती देताना प्रो. सुरिंदर चोप्रा म्हणाले, की मक्यांमध्ये लाल रंग येण्यामागे कारणीभूत असलेल्या जनुकांचा अभ्यास गेल्या शतकापासून सुरू आहे. अगदी १९६० मध्ये मिन्निसोटा विद्यापीठातील डॉ. चार्ल्स बर्नहॅम यांनी यासाठी कारणीभूत म्युटंट ओळखले होते. त्याचे बियाणे त्यांचे विद्यार्थी डेरेके स्टाईल्स यांच्याकडे होते. ते त्यांच्याकडून आम्हाला १९९७ मध्ये मिळाले आणि आमच्या अभ्यासाला सुरवात झाली.

प्रो. चोप्रा यांच्या नेतृत्त्वाखालील अभ्यासात म्युटंट मक्यातील जनुक ओळखले. त्याला Ufo१( म्हणजेच भगव्या रंगासाठी अस्थिक घटक अनस्टेबल फॅक्टर फॉर ऑरेंज १) असे नाव देण्यात आले. त्यानंतर पेन्न विद्यापीठामध्ये संशोधन करताना चोप्रा आणि सहकाऱ्यांनी या मका वाणासोबत अन्य वाणांचे संकर करून पाहिले. गेल्या तीन वर्षांमध्ये ४ हजारपेक्षा अधिक वाणांच्या संकराचे नकाशे मिळवले. या संशोधनाचे निष्कर्ष दी प्लॅंट सेलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जनुक न सापडण्याचे कारण ः

  • विविध संकरित वाणांच्या स्नायूंपासून आरएनए सिक्वेन्सिंग तंत्राद्वारे आणि जीन क्लोनिंग साधनांनी जनुकीय पातळीवर अभ्यास केला. त्यातून संशोधकांना आजवर उपलब्ध नसलेली माहिती मिळवण्यात यश आले. मक्यातील लाल रंग आणणाऱ्या जनुकांना कार्यान्वित करणाऱ्या किंवा थांबवणाऱ्या जनुकांचा शोध लागला. अशा प्रकारचा Ufo१ हा जनुक मक्याबरोबरच ज्वारी, भात आणि नाचणीमध्ये आढळतो.
  • मात्र, मक्यामध्ये Ufo१ हे म्युटंट जनुक लाल रंग आणत नाही, तर तो पेरकॉर्प कलर१ (पी१) या जनुकामुळे येतो. या जनुकांचे नियंत्रण Ufo१ जनुकाच्या जवळच्या जनुकाकडून केले जाते. सातत्याने जागा बदलत असल्याने अशा जनुकाला जंपीग जीन असे म्हणतात. तो सुरू झाल्यानंतर Ufo१ पण सुरू होतो. त्याने पी१ जनुक आपले काम करू लागतो. जंपीग जनुक बंद असताना, Ufo१ ही शांत राहतो. अशा प्रकारे पी१ चे नियंत्रण केले जाते. या कारणामुळे Ufo१ हे जनुक आजवर दृष्टीपथात येत नव्हते, असे चोप्रा यांनी सांगितले.

अधिक अभ्यासातून अधिक फायदा ः

  • हजारो जनुकांपासून एका जनुकापर्यंत पोचण्यामध्ये यश आले असले तरी त्यांच्या कार्याबाबत अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता संशोधक व्यक्त करतात. Ufo१हे जनुक पी१ बरोबर कशाप्रकारे संपर्क किंवा समन्वय साधते, यावर पुढील टप्प्यामध्ये लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कारण Ufo१ केवळ लाग रंग येण्यापुरते नियंत्रण करत असेल, असे नाही. विशेषतः वनस्पती ज्या वेळी ताणामध्ये असेल, त्या वेळी अधिक कार्यान्वित होऊन ते सर्वा जनुकांचे नियंत्रण करू शकेल.
  • मक्याच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात शर्करा जमा होण्यासोबतच मायसिन (नैसर्गिक किटकनाशक) Ufo१ हे जनुक महत्त्वाचे आहे. त्यामुळे मक्याची गोडी वाढण्यासोबतच किडीरोगापासून मका पिकाच्या संरक्षणाला चालना मिळते. भविष्यात बायोमास आणि अधिक जैवइंधनाच्या निर्मितीला यातून चालना मिळू शकते.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...