agricultural stories in Marathi, agrovision, Women’s brains look years younger than those of men | Agrowon

चयापचयामध्ये महिलांचे मेंदू पुरुषांपेक्षा अधिक तरुण
वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

महिलांच्या मेंदूमध्ये शर्करेचे रूपांतर ऊर्जेमध्ये करण्याचा दर हा पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांच्या मेंदूमध्ये अधिक असल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठात झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे. चयापचयाच्या बाबतीमध्ये महिलांचे मेंदू हे पुरुषांपेक्षा काही वर्षे अधिक तरुण दिसत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

महिलांच्या मेंदूमध्ये शर्करेचे रूपांतर ऊर्जेमध्ये करण्याचा दर हा पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांच्या मेंदूमध्ये अधिक असल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठात झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे. चयापचयाच्या बाबतीमध्ये महिलांचे मेंदू हे पुरुषांपेक्षा काही वर्षे अधिक तरुण दिसत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

मानवी शरीरातील पेशींसाठी ऊर्जेचा प्राथमिक स्रोत म्हणून ग्लुकोज (शर्करेचा एक प्रकार) अत्यंत महत्त्वाचा असतो. मानवी शरीरातील सर्वाधिक ऊर्जेची मागणी असलेला अवयव म्हणजे मेंदू असून, एकूण शर्करा ऊर्जेच्या अर्ध्याइतका भाग मेंदूकडे पाठवला जातो. ग्लुकोजशिवाय मेंदूची विविध कामे उदा. विचार करणे, स्मृती, शिकणे यावर परिणाम होतो. ज्यांच्या रक्तामध्ये शर्करेचे प्रमाण कमी असते, (त्याला शास्त्रीय भाषेमध्ये हायपोग्लायसेमिया म्हणतात.) अशा व्यक्तींचे अवधान आणि एकूणच मेंदूच्या प्रक्रिया शिथिल असल्याचे दिसून येते.
बालकावस्थेमध्ये मेंदूची शर्करेची मागणी ही सर्वाधिक असते. या विकासाच्या काळामध्ये नवे न्युरॉन्स तयार होऊन, त्यांच्यामध्ये समन्वयाचे बंध तयार होत असतात. पुढे वाढीच्या अवस्थेमध्ये पौगंडावस्था ते वृद्धापकाळ या काळात हळूहळू शर्करेची ही मागणी कमी होत जाते. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये प्रौढ महिलांचे मेंदू पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक ऊर्जा निर्माण करत असल्याचे दिसून आले.

  • हे प्रमाण अगदी २० वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले. हे निष्कर्ष २०५ आरोग्यपूर्ण व्यक्तींच्या मेंदूला होत असलेल्या ऑक्सिजन, ग्लुकोज आणि रक्तांच्या पुरवठ्याचे मोजमापानंतर मांडले आहेत.
  • पुरुषांचे मेंदू त्यांच्या प्रत्यक्षातील वयापेक्षा चयापचयाच्या दृष्टीने २.४ वर्षे अधिक वयाचे वाटतात. कमी साखरेचे ऊर्जेमध्ये करण्याची ही क्रिया पुरुषांमध्ये प्रौढत्वाच्या सुरवातीच्या अवस्थेपासूनच दिसू लागते. त्यामागील नेमक्या यंत्रणेचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र, एक गृहितक असेही आहे, की तरुणपणामध्ये इस्ट्रोजन हे गुंतागुंतीच्या विविध प्रक्रियामध्ये कार्यरत होत असल्यामुळे महिलांना अधिक ऊर्जेची आवश्यकता भासत असावी. - वॉशिंग्टन विद्यापीठातील रेडिओलॉजीचे सहाय्यक प्रा. मानू गोयल यांनी सांगितले की, याचा अर्थ असा नाही, की पुरुषांचे मेंदू वेगाने वयस्कर होतात. ते मुलीपेक्षा तीन वर्षे उशिरा प्रौढत्वामध्ये प्रवेश करतात. हाच कालावधी पुढे आयुष्यभर राहत असावा.
  • स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक दीर्घायू राहून, वृद्धापकाळामध्येही त्यांचा मेंदू अधिक कार्यरत असण्याचे कारण यातून मिळू शकेल.
  • हे संशोधन ‘दी प्रोसिंडिंग्ज ऑफ दी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

इतर बातम्या
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...