सा खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करून ते २९०० रुपयांवरून ३१०० रुपये
ताज्या घडामोडी
महिलांच्या मेंदूमध्ये शर्करेचे रूपांतर ऊर्जेमध्ये करण्याचा दर हा पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांच्या मेंदूमध्ये अधिक असल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठात झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे. चयापचयाच्या बाबतीमध्ये महिलांचे मेंदू हे पुरुषांपेक्षा काही वर्षे अधिक तरुण दिसत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
महिलांच्या मेंदूमध्ये शर्करेचे रूपांतर ऊर्जेमध्ये करण्याचा दर हा पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांच्या मेंदूमध्ये अधिक असल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठात झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे. चयापचयाच्या बाबतीमध्ये महिलांचे मेंदू हे पुरुषांपेक्षा काही वर्षे अधिक तरुण दिसत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
मानवी शरीरातील पेशींसाठी ऊर्जेचा प्राथमिक स्रोत म्हणून ग्लुकोज (शर्करेचा एक प्रकार) अत्यंत महत्त्वाचा असतो. मानवी शरीरातील सर्वाधिक ऊर्जेची मागणी असलेला अवयव म्हणजे मेंदू असून, एकूण शर्करा ऊर्जेच्या अर्ध्याइतका भाग मेंदूकडे पाठवला जातो. ग्लुकोजशिवाय मेंदूची विविध कामे उदा. विचार करणे, स्मृती, शिकणे यावर परिणाम होतो. ज्यांच्या रक्तामध्ये शर्करेचे प्रमाण कमी असते, (त्याला शास्त्रीय भाषेमध्ये हायपोग्लायसेमिया म्हणतात.) अशा व्यक्तींचे अवधान आणि एकूणच मेंदूच्या प्रक्रिया शिथिल असल्याचे दिसून येते.
बालकावस्थेमध्ये मेंदूची शर्करेची मागणी ही सर्वाधिक असते. या विकासाच्या काळामध्ये नवे न्युरॉन्स तयार होऊन, त्यांच्यामध्ये समन्वयाचे बंध तयार होत असतात. पुढे वाढीच्या अवस्थेमध्ये पौगंडावस्था ते वृद्धापकाळ या काळात हळूहळू शर्करेची ही मागणी कमी होत जाते. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये प्रौढ महिलांचे मेंदू पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक ऊर्जा निर्माण करत असल्याचे दिसून आले.
- हे प्रमाण अगदी २० वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले. हे निष्कर्ष २०५ आरोग्यपूर्ण व्यक्तींच्या मेंदूला होत असलेल्या ऑक्सिजन, ग्लुकोज आणि रक्तांच्या पुरवठ्याचे मोजमापानंतर मांडले आहेत.
- पुरुषांचे मेंदू त्यांच्या प्रत्यक्षातील वयापेक्षा चयापचयाच्या दृष्टीने २.४ वर्षे अधिक वयाचे वाटतात. कमी साखरेचे ऊर्जेमध्ये करण्याची ही क्रिया पुरुषांमध्ये प्रौढत्वाच्या सुरवातीच्या अवस्थेपासूनच दिसू लागते. त्यामागील नेमक्या यंत्रणेचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र, एक गृहितक असेही आहे, की तरुणपणामध्ये इस्ट्रोजन हे गुंतागुंतीच्या विविध प्रक्रियामध्ये कार्यरत होत असल्यामुळे महिलांना अधिक ऊर्जेची आवश्यकता भासत असावी. - वॉशिंग्टन विद्यापीठातील रेडिओलॉजीचे सहाय्यक प्रा. मानू गोयल यांनी सांगितले की, याचा अर्थ असा नाही, की पुरुषांचे मेंदू वेगाने वयस्कर होतात. ते मुलीपेक्षा तीन वर्षे उशिरा प्रौढत्वामध्ये प्रवेश करतात. हाच कालावधी पुढे आयुष्यभर राहत असावा.
- स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक दीर्घायू राहून, वृद्धापकाळामध्येही त्यांचा मेंदू अधिक कार्यरत असण्याचे कारण यातून मिळू शकेल.
- हे संशोधन ‘दी प्रोसिंडिंग्ज ऑफ दी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
- 1 of 348
- ››