बायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणार

बायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणार
बायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणार

येल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या मूलद्रव्यीय यंत्रणेमुळे बायोलेजिक्स या प्रथिनांवर आधारित औषधोपचारांची परिणामकारकता वाढवणे शक्य होणार आहे. श्वसनाचे विकार, कर्करोगाचे काही प्रकार अशा उपचारासाठी अवघड मानल्या जाणाऱ्या आजारांसाठी बायलेजिक्स औषधांचा वापर केला जातो. बायोलेजिक्समध्ये प्रामुख्याने प्रथिनांचा समावेश असतो. ही प्रथिने पेशीमध्ये जाऊन आपला परिणाम दाखवतात आणि जी बायोलेजिक्स औषधे असा परिणाम दाखवू शकत नाही, ती पेशीभित्तिकांचा अडसर ओलांडण्यात कमी पडतात. याविषयी माहिती देताना येल विद्यापीठातील संशोधक अॅलाना स्केपार्ट्झ यांनी सांगितले, की गेल्या काही दशकांपासून प्रथिनांचा वापर औषधांसाठी होत असून, ती पेशींच्या सीमा ओलांडून आतपर्यंत जातात. या पेशीय कप्प्यांना एन्डोसोम्स असे म्हणतात. स्केपार्ट्झ आणि सहकाऱ्यांनी एन्डोसोम्सचा अडथळा कार्यक्षमपणे पार पाडणारी मूलद्रव्यीय किल्ली शोधली आहे. पेशीअंतर्गत भागांपर्यंत औषधी प्रथिनांसाठी विशेष रस्ता तयार होऊ शकतो. हे संशोधन जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. स्केपार्ट्झ यांचे पदवीचे विद्यार्थी अॅंजेला स्टेनॉयर, जोनाथन लारोचेल्ले आणि सुसान नॉक्स यांच्यासह पोस्ट डॉक्टरल सहकारी रिबेका विस्सनर यांनी एन्डोसोम्समध्ये शिरण्याची किल्ली, ज्याला होमोटायपिक फ्युजन अॅंड व्हॅक्युल प्रोटिन सॉर्टिंग (HOPS) कॉम्प्लेक्स शोधले आहे. ही बहुप्रथिन यंत्रणा असून, ती कार्यरत असताना औषधी प्रथिने सहजतेने पार जाऊ शकतात. ती कार्यरत नसताना मात्र प्रथिने त्यात अडकून पडतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com