agricultural stories in Marathi, agrowon, agralekh on difficulties in micro irrigation | Agrowon

सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या
विजय सुकळकर
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

वितरकांकडून नोंदणी बंद असताना ज्या शेतकऱ्यांनी ठिबक बसविले, त्यांना पूर्वसंमती आणि नोंदणीअभावी शासकीय अनुदान मिळण्यास विलंब होईल अथवा काही अनुदानापासून वंचितही राहतील.

राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर व्हायला पाहिजे, असे सर्व स्तरातून शेतकऱ्यांना प्रबोधन केले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा पाण्याच्या कार्यक्षम वापराचे महत्त्व कळाले आहे. त्यामुळेच सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करण्यासाठी राज्यातील शेतकरी सरसावत असताना मागील तीन-चार वर्षांपासून शासनासह एकूणच यंत्रणा त्यांना अडचणी आणत आहे. २०१४-१५ च्या आधी जेवढ्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी अर्ज केला, त्या सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळत होता. परंतु योजनेमध्ये गैरप्रकारही अधिक होते. त्यानंतर सूक्ष्म सिंचनासह अनुदान वाटपाच्या योजना ऑनलाइन करण्यात आल्या. ऑनलाइन पद्धतीने योजना अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक होणे अपेक्षित असताना यंत्रणेतील काही महाभाग त्यात खोळंबा घालत आहेत. मुळात सूक्ष्म सिंचनासाठी निधीची तरतूद कमी करायची, ऑनलाइन नोंदणीस उशिरा सुरवात करायची, पूर्वसंमतीसारख्या किचकट अटी त्यात टाकायच्या, प्रस्ताव स्वीकारण्याचा कालावधी कमी ठेवायचा, स्पॉट व्हेरिफिकेशन करून ऑनलाइन अहवाल पाठविण्यास विलंब करायचा या सर्व प्रकारांमुळे ठिबक, तुषार सिंचन घेऊनही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत.
यावर्षी तर वितरकांनी २०१४ पासून विक्री केलेल्या संचांची संख्या, वितरित केलेले अनुदान आणि कराचा भरणा अशी माहिती वितरकांना मागितली होती. वितरकांना त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांनी नोंदणीवर बहिष्कार टाकला होता. आता जुन्याएेवजी नव्याने सर्व माहिती भरून घेण्यावर वितरक आणि कृषी विभागात एकमत झाले आहे. त्यामुळे नोंदणीवरील बहिष्कार वितरकांनी मागे घेतला असला तरी आगामी तीन-चार महिन्यांत या वर्षीसाठीचा प्राप्त निधी खर्च करणे कृषी विभागापुढे मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे वितरकांकडून नोंदणी बंद असली तरी या सहा-सात महिन्यांच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांना ठिबक बसवायचे होते, त्यांनी ते बसविले. मात्र, आर्थिक अडचणीतील अशा अनेक शेतकऱ्यांना पूर्वसंमती आणि नोंदणीअभावी शासकीय अनुदान मिळण्यास विलंब होईल अथवा काहींना अनुदानाचा लाभ मिळणारही नाही. त्यामुळे या योजनेसाठीचा मंजूर निधी वर्षभराच्या ठरावीक कालावधीत खर्च होणार नाही. सूक्ष्म सिंचनाबाबतचे सर्व रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी शासन वितरकांकडून माहिती भरून घेण्याची कसरत करीत आहे. त्याएेवजी शासनाने नोंदणीकृत कंपन्यांची संच अथवा साहित्य विक्री (सेल), हेच वितरकांची खरेदी (पर्चेस) असते. हे सर्व ऑनलाइन लिंक करून त्यानंतर वितरकांकडून झालेली विक्री हे टॅली केले तर सर्व रेकॉर्ड शासनाला मिळेल, असे केल्यास कोणाकडून काही माहिती भरून घेण्याची गरज शासनाला पडणार नाही. यातील अनागोंदीही दूर होतील.

ठिबकसाठीची वितरकांकडून नोंदणीच यावर्षी आता खूप उशिराने सुरू झालेली आहे. त्यामुळे नोंदणीपासून ते पूर्वसंमती, प्रस्ताव सादर करणे, स्पॉट व्हेरिफिकेशन करून कृषी विभागाकडून अहवाल सादर करणे, त्यास मंजुरी मिळून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होईपर्यंतची ही सर्व प्रक्रिया अत्यंत गतिमान व्हायला पाहिजे. ऊस पट्ट्यातील आठ कमांड एरियामध्ये ठिबक सक्तीचे केले आहे. यासाठी ऊस उत्पादकांना हेक्टरी एक लाख २० हजार रुपये दोन टक्के व्याजदराने शासन कर्ज देणार आहे. पाच वर्षांच्या कर्ज परतफेडीत शेतकऱ्यांना केवळ ६ हजार रुपयांचा फायदा होणार आहे. मात्र असे शेतकरी हेक्टरी जवळपास ५० ते ६० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.

 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...