agricultural stories in Marathi, agrowon, agralekh on parrot decreasing issue | Agrowon

अधिवास वाचवा; निसर्ग वाचेल
विजय सुकळकर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास, अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडे झुडूपे यांचे संवर्धन करायला पाहिजे.

दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास, अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडे झुडूपे यांचे संवर्धन करायला पाहिजे.

माळढोक, घार, साळुंखी या पक्ष्यांसह राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारे पोपटही आता दुर्मीळ होत चालले आहेत. मुंग्यांपासून मधमाश्‍यांपर्यंत निसर्गात आढळणाऱ्या प्रत्येक जिवाला महत्त्व आहे. निसर्गातील एखादा जीव घटक धोक्‍यात आला तर पूर्ण निसर्ग चक्र, पर्यावरणाचा समतोल बिघडतो. शेतीत होणारा अनियंत्रित कीडनाशकांचा वापर, विकासाच्या नावाखाली होत असलेली वाढती प्रामुख्याने जुन्या वृक्षांची तोड, वाढती शिकार, महत्वाचे म्हणजे पक्ष्यांचे स्थानिक अधिवास समजले जाणारे मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढे, माळरान, जंगल नष्ट होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा अन्न, वस्त्र, निवाराच धोक्‍यात आला आहे. बोर, बाभूळ, वड, उंबरासारख्या जुन्या मोठ्या झाडांची फळे पक्षी खातात. अशा जुन्या-मोठ्या झाडांवरच पक्षी आपली घरटी बांधतात. अशा वृक्षांच्या तोडीने पक्ष्यांना अन्न मिळत नसून ते उघड्यावरही पडत आहेत. शेतात कीडनाशके फवारल्याने शत्रू-मित्र कीटकही मरतात. या विषारी कीटकांना पक्षी खाऊन तेही मरत आहेत. वाढत्या तापमानाने पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, त्याचे सर्वांत जास्त दुष्परिणाम शेती क्षेत्र भोगत आहे. अशा वेळी स्थानिक अधिवासही नष्ट करून त्यावरील जीवसृष्टी धोक्‍यात आणून आपण निसर्ग चक्र, पर्यावरणाचा समतोल अधिकच बिघडवत चाललो आहोत.

निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. जेथे जंगल-जैवविविधता अधिक तेथे जगण्याचा आनंदही जास्त, हे अनेक देशांत सिद्ध झाले आहे. असे असताना निसर्गाला वाचवायचे सोडून त्यास ओरबडण्याचे काम आपण मागील अनेक वर्षांपासून करीत आहोत. पर्यावरणाच्या योग्य समतोलासाठी देशात एकूण क्षेत्राच्या किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे. अशावेळी देशात जंगलाचे प्रमाण गरजेच्या जवळपास निम्म्यावरच येऊन पोचले असून दिवसागणिक या क्षेत्रात घट होत आहे. दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडेझुडपे यांचे संवर्धन करायला पाहिजे. स्थानिक अधिवासांच्या महत्त्वाबाबत गावातील प्रत्येक नागरिकांमध्ये प्रबोधन व्हायला हवे. गावातील शाळा, ग्राम पंचायत कार्यालय यातून निसर्ग शिक्षणाचे धडे गावकऱ्यांना मिळायला हवेत. आपल्या गावचा निसर्ग काय सांगतो? हे कळल्याशिवाय त्यांचे महत्त्व गावकऱ्यांना समजणार नाही. आज आपण पाहतोय वाढते शहरीकरण, रस्ते इतर कामांसाठी जुनी झाडे तोडून त्याऐवजी एकतर काहीच लावले जात नाही, अथवा विदेशी झाडे लावली जात आहेत. अशा बहुतांश झाडांना फळे तर येतच नाहीत, त्यावर पक्षीही घरटे बांधत नाहीत. त्यामुळे विकास कामांसाठी जी झाडे तोडली तीच झाडे तोडलेल्या प्रमाणात दुसरीकडे लावायला हवीत. शेतीत कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरावरही मर्यादा यायला हव्यात. कीडनाशकांचा वापर सुरक्षित व्हायला हवा. त्यातून मित्र कीटकांबरोबर पक्षी मरणार नाहीत, याची काळजी घ्यायला पाहिजे. निसर्गाला आपल्या मनाप्रमाणे राहू दिल्यास, त्यातील जीवसृष्टीही टिकून राहील आणि निसर्गही आपल्याला भरभरून देईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

इतर संपादकीय
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
फूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...
शेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...
नदीजोड ः संकल्पना की प्रकल्परखडलेले प्रकल्प ः असंख्य प्रकल्प इतके रखडले आहेत...
‘ई-नाम’ कशी होईल गतिमान?प्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट,...
‘ट्रेलर’चा उत्तरार्धही फसवाआमच्या शासन काळात भ्रष्टाचार दूर झाला, महागाई कमी...
आयातीने कोलमडले काजू शेतीचे अर्थकारण२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
भ्रष्ट आणि निगरगट्टकृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस...
सेंद्रिय शेतीस मिळेल बळखरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती...
हमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया...
समन्यायी विकासाचे धोरण कधी?लोकपाल नियुक्तीबरोबर शेतकऱ्यांच्या काही...
सुबाभळीपासून मिळवा चारा, इंधन आणि...बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने...
सोयाबीन, शेतकरी आणि शासनसोयाबीनचा आणि माझा संबंध तसा १९७२ पासूनचा. त्या...
पशुधन विमा आजची गरजचगा यींचा १०० टक्के विमा शासनातर्फे उतरविण्याची...
कसा वाढेल निर्यातीचा टक्का? देशाचे नवे कृषी निर्यात धोरण डिसेंबर २०१८ मध्येच...
शेवटच्या संधीचेही केले मातेरेशेतकऱ्यांच्या अपेक्षा   अंशतः लुटवापसी...
विनाश की शाश्वत विकासचौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद मुंबई येथे...