agricultural stories in Marathi, agrowon, agralekh on seed production | Agrowon

बीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती
विजय सुकळकर
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

अत्यंत कमी पाण्यातही योग्य नियोजनाअंती उत्तम बीजोत्पादन होऊ शकते हा बुलडाणा जिल्ह्याने दिलेला संदेश राज्यातील इतर जिल्ह्यातही पोचायला हवा.

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे बुलडाणा. या जिल्ह्याचा बहुतांश भाग हा दुष्काळी आहे, तर काही क्षेत्र खारपाण पट्ट्यात मोडते. पाण्याची कमतरता आणि सिंचनाच्या सोयीसुविधांचा अभावामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कापसासह अन्नधान्य पिकांची पारंपरिक शेती होते. वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीतून उत्पादनाची हमी नाही. मिळालेल्या उत्पादनाला योग्य दाम नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही बेताचीच आहे. अशा परिस्थितीमध्ये बुलडाणा जिल्‍ह्यातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, चिखली तालुक्यांतील लहान-मोठ्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाची कास धरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे तालुके राज्याचे सीड हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्य जालना जिल्ह्यास लागून आहेत. सोयाबीन, कापसासह मिरची, टोमॅटो, वांगी, सिमला मिरची, काकडी अशा अनेक भाजीपाल्यांचे बीजोत्पादन आता बुलडाणा जिल्ह्यात होत आहे.

बीजोत्पादनातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा हमखास स्रोत तर मिळाचा आहे. परंतु यांस लागून इतरही अनेक रोजगाराच्या संधी युवकांना उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे मराठवाडा, विदर्भातून सध्याच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, युवकांचे शहरांकडे स्थलांतर वाढले असताना या जिल्ह्यातून मात्र स्थलांतराला काहीसा ब्रेक लागला आहे. बीजोत्पादनामुळे गावागावांत कुशल मजूर तयार होत असून, त्यांच्या हाताला काम आणि त्यास योग्य दामही मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने बीजोत्पादनाचे अनेक फायदे आहेत. बीजोत्पादनामुळे उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब तर होतोच शिवाय त्यास काटेकोर नियोजनाची जोडसुद्धा मिळते. बुलडाणा जिल्ह्यातील बीजोत्पादन हे राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय स्तरावरील भाजीपाला बियाणे उत्पादक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून करून घेत आहेत. त्यामुळे या कंपन्या शेतकऱ्यांना बीजोत्पादनातील सर्व तांत्रिक माहिती, प्रसंगी तंत्रज्ञान अवलंबासाठी आर्थिक साह्यही करतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्यास करारात ठरल्याप्रमाणे संबंधित कंपनीकडून दर मिळतो. त्यामुळे पारंपरिक शेतीमाल उत्पादनाला प्रकर्षाने जाणवत असलेली मार्केट आणि रेटची अनिश्चितता बीजोत्पादन प्लॉटसाठी तरी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सध्या सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन होत असून, योग्य आर्थिक-तांत्रिक मदत मिळाल्यास हे क्षेत्र दुपटीने वाढू शकते, असे यातील जाणकार सांगतात. अशावेळी खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, महाबीज, राष्ट्रीय बीज निगम यांनी बीजोत्पादनातील संधी, फायदे याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवायला हवे. बीजोत्पादनासंदर्भातील शासनाच्या योजनांची माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला हवी. बीजोत्पादन प्लॉटला अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींचाही मोठा फटका बसतो. त्यामुळे उघड्यावरील अथवा शेडनेटमधील बीजोत्पादनास पीकविम्याचा आधार मिळायला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, त्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करायला हवा. अत्यंत कमी पाण्यातही योग्य नियोजनाअंती उत्तम बीजोत्पादन होऊ शकते हा बुलडाणा जिल्ह्याने दिलेला संदेश राज्यातील इतर जिल्ह्यातही पोचायला हवा. राज्यात जिल्ह्यानिहाय ‘सीड हब’ उभे राहिल्यास आपली ओळखही आंध्र प्रदेशप्रमाणे ‘सीड कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी होण्यास वेळ लागणार नाही.
.......................

इतर संपादकीय
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
फूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...
शेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...
नदीजोड ः संकल्पना की प्रकल्परखडलेले प्रकल्प ः असंख्य प्रकल्प इतके रखडले आहेत...
‘ई-नाम’ कशी होईल गतिमान?प्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट,...
‘ट्रेलर’चा उत्तरार्धही फसवाआमच्या शासन काळात भ्रष्टाचार दूर झाला, महागाई कमी...
आयातीने कोलमडले काजू शेतीचे अर्थकारण२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
भ्रष्ट आणि निगरगट्टकृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस...
सेंद्रिय शेतीस मिळेल बळखरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती...
हमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया...
समन्यायी विकासाचे धोरण कधी?लोकपाल नियुक्तीबरोबर शेतकऱ्यांच्या काही...
सुबाभळीपासून मिळवा चारा, इंधन आणि...बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने...
सोयाबीन, शेतकरी आणि शासनसोयाबीनचा आणि माझा संबंध तसा १९७२ पासूनचा. त्या...
पशुधन विमा आजची गरजचगा यींचा १०० टक्के विमा शासनातर्फे उतरविण्याची...