agricultural stories in Marathi, agrowon, agroplanning, citrus advice for december | Agrowon

संत्रा, मोसंबी व लिंबू सल्ला
डाॅ. एम. एस. लदानिया
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

अांबिया बहर व्यवस्थापन ः

अांबिया बहर व्यवस्थापन ः

  • अांबिया बहराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर त्वरित काबेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अांबिया बहर घेण्याकरिता झाडाला ताबडतोब ताण द्यावा. पाणी देऊ नये. अधिक चांगल्या प्रकारे ताण देण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये क्लोरमेक्वॉट क्लोराईड २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • झाडाखालील तणे काढून बाग स्वच्छ करावी.
  • बुंध्याजवळ मातीचे ढीग असल्यास त्यांना तोडून मोकळे करून घ्यावे.

मृग बहर व्यवस्थापन ः

  • मृग बहर धरलेल्या संत्रा व मोसंबी झाडांसाठी ठिंबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. या काळात ६ वर्षांच्या झाडाला प्रतिदिन ४१ लिटर, ८ वर्षांच्या झाडाला ६५ लिटर, आणि १० वर्षांच्या झाडाला ८२ लिटर पाणी द्यावे.
  • लिंबू झाडांसाठी ६ वर्षे वयाच्या झाडाला प्रतिदिन २३ लिटर, १० वर्षांच्या झाडाला ७५ लिटर पाणी द्यावे.
  • मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, फवारणी
    एक ग्रॅम जिबरेलिक आम्ल अधिक मोनोपोटॅशिअम फाॅस्फेट किंवा डायअमोनियम फॉस्फेट किंवा पोटेशिअम नायट्रेट यापैकी एक १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी.
  • १५-२० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

कीड व्यवस्थापन ः
लिंबूवरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,
फवारणी प्रतिलिटर पाणी
क्विनालफाॅस दीड मिलि किंवा नोव्हॅल्युरॉन १ मिलि. किंवा डायमिथोएट १.५ मिलि.
आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

या महिन्यामध्ये मृग बहराच्या फळांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसतो. कोळी प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे हळूहळू ते काळ्या रंगाचे होतात. स्थानिक भाषेमध्ये त्याला ‘लाल्या’ संबोधले जाते.
कोळी नियंत्रणाकरिता, फवारणी प्रतिलिटर पाणी
डायकोफाॅल १.५ मिलि. किंवा इथिआॅन २ मिलि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम
आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

रोग व्यवस्थापन ः

  • झाडाच्या बुंध्यावर २ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना प्रत्येकी ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट करावी.
  • संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास तीक्ष्ण चाकूने खरडून स्वच्छ करून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल २०० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे पेस्ट बनवून लावावी.

संपर्क ः  ०७१२-२५००३२५
(केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

इतर फळबाग
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
थंडीपासून फळबागेचे संरक्षणसध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे....
थंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या...सध्याच्या थंड वातावरणात विकासाच्या विविध अवस्थेत...
भुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची...
नियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...मोसंबी झाडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून...
फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे...शास्त्रीय नाव ःOthreis fullonia फळातील रस...
मोसंबी, डाळिंबातील फळे पोखरणाऱ्या अळीचे...  मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांमध्ये फळ...
निरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून...येत्या आठवड्यामध्ये बहुतांशी सर्व द्राक्ष...
डाळिंबातील फॉस्फोनीक ॲसिड अवशेष समस्याबाजारपेठेत स्फुरदयुक्त विविध घटक त्यांच्या...
पेरू बागेत फळमाशीचा प्रादुर्भावसध्या पेरू बागा फळधारणेच्या व काढणीच्या अवस्थेत...
रुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....
केळी सल्ला : थंडीचा परिणामसद्य:स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा आहे...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
डाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे... डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
सुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...