मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग रोखण्यासाठी उपयोगी

मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग रोखण्यासाठी उपयोगी
मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग रोखण्यासाठी उपयोगी

गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी मुळाही अत्यंत उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. सकुराजिमा डायकेन किंवा मॉन्स्टर रॅडीश या नावाने ओळखले जाणारे जपानी मुळ्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक संयुगे असल्याचे संशोधनात आढळले आहे. या मुळ्याच्या खाण्यामुळे हृदय रोग आणि पक्षाघाताच्या शक्यता कमी होण्यास मदत होते. हे संशोधन ‘एसीएस’च्या ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूट केमिस्ट्री’मध्ये मांडण्यात आले आहे. मोठ्या आकाराच्या भाज्यामध्ये जपानमधील सकुराजिमा प्रसिद्ध आहे. २००३ मध्ये जगातील सर्वाधिक वजनदार मुळा म्हणून ६९ पौंड वजनाच्या सकुराजिमा मुळ्याची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली. मुळ्यामध्ये आरोग्यदायी अॅण्टीऑक्सिडेन्स घटक भरपूर प्रमाणात असून, त्यामुळे रक्तदाब व रक्तातील गुठळ्यांचे प्रमाण कमी होते. मात्र, सामान्य मुळे आणि सकुराजिमा मुळे यातील आरोग्यदायी घटकांच्या प्रमाणाविषयी नेमकेपणाने माहीत नव्हते. त्याविषयी कात्सुको कजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला. रक्तवाहिन्यांच्या कार्यामध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण मिळवण्यात आले. या मोठ्या आकाराच्या जपानी मुळ्यामध्ये नायट्रीक ऑक्साइडचे प्रमाण सामान्य मुळ्याच्या तुलनेमध्ये अधिक आहे. त्याचप्रमाणे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये बदलाला चालना देणारे वनस्पती संजीवक ट्रीगोनेल्लिनही ओळखण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com