खजुराच्या टाकाऊ घटकापासून वाहनांच्या भागांची निर्मिती शक्य

खजुराच्या टाकाऊ घटकापासून वाहनांच्या भागांची निर्मिती शक्य
खजुराच्या टाकाऊ घटकापासून वाहनांच्या भागांची निर्मिती शक्य

पिकांच्या अवशेषापासून वाहन व जहाज उद्योगातील अनेक घटकांची निर्मिती करता येणे शक्य असल्याचे मत पोर्टस्माऊथ विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्याच्या अनेक उत्पादनांना पर्यावरणपूरक, स्वस्त आणि वजनाला हलके पर्याय देणे शक्य होणार आहे. या विद्यापीठात राबवलेल्या प्रकल्पात खजूराच्या टाकाऊ घटकांपासून नैसर्गिक फायबर तयार करण्यात यश आले आहे. उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये खजुराची लागवड मोठ्या क्षेत्रावर आहे. यातून मोठ्या प्रमाणात टाकाऊ घटक तयार होतात. सध्या या घटकांची जाळून विल्हेवाट लावली जाते. त्याचा फटका पर्यावरणाला आणि मातीतील सूक्ष्मजीवांना बसतो. एकूणच शेती व खाद्य उद्योगामध्ये शिल्लक पिकांचे व अन्नधान्यांचे टाकाऊ घटकांची विल्हेवाट लावण्याची समस्या तीव्रतेने जाणवत आहे. तो टाळण्यासाठी पोर्टस्माऊथ विद्यापीठातील अत्याधुनिक धातू आणि उत्पादन संशोधन गटाद्वारे संशोधक डॉ. होम धखाल यांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक फायबर निर्मितीचा प्रकल्प राबवण्यात आला. त्यात केम्ब्रिज विद्यापीठ, इनरा ही फ्रेंच संशोधन संस्था, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटानी, दक्षिण येथील संशोधकांचाही संशोधनामध्ये सहभाग आहे. त्यांनी खजुराच्या तंतुमय पदार्थापासून फायबर सेक्शन तयार केले आहेत. हे पॉलिकॅप्रोलॅक्टोन (पीसीएल) घटक संपूर्णपणे विघटनशील असून, पुनर्वापरयोग्य आहे. त्यांची तन्यता क्षमतेसह अनेक वैशिष्ट्ये कृत्रिम काच किंवा कार्बन फायबर प्रमाणे किंवा त्याहीपेक्षा चांगली आहेत. हे संशोधन जर्नल इंडस्ट्रियल क्रॉप्स अॅंड प्रोडक्ट्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना डॉ. धकाल म्हणाले, की खजुराच्या झाडाच्या विविध घटकांपासून वजनाने हलके बायोकंपोझिट तयार केले आहे. ते स्वस्त असून, वाहनाच्या विविध भागासाठी वापरणे शक्य आहे. याच्या वापरामुळे वाहनाचे वजन हलके होणार असून, इंधनामध्ये बचत होईल. संपूर्णपणे विघटनशील असल्याने पर्यावरणपूरकही आहे. त्याचप्रमाणे याच्या निर्मितीसाठी काच आणि कार्बन फायबरच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी ऊर्जा लागते. नैसर्गिक फायबर क्षमतेच्या चाचण्या वाहन उद्योगासह घेण्यात आल्या असून, त्यांच्या मागणीनुसार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com