agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Blazes of light reveal how plants signal danger long distances | Agrowon

इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा संदेश
वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या अंतर्गत कॅल्शिअमची एक तरंग कार्यान्वित होत असल्याचे विस्कॉन्सिन - मॅडिसन विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. त्यातून वनस्पतीची संरक्षण यंत्रणा कार्यान्वित होते. वनस्पतीतील अंतर्गत समन्वय प्रणालीतील आजवर अज्ञात असलेल्या या घटकाचा शोध महत्त्वाचा ठरणार आहे.

जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या अंतर्गत कॅल्शिअमची एक तरंग कार्यान्वित होत असल्याचे विस्कॉन्सिन - मॅडिसन विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. त्यातून वनस्पतीची संरक्षण यंत्रणा कार्यान्वित होते. वनस्पतीतील अंतर्गत समन्वय प्रणालीतील आजवर अज्ञात असलेल्या या घटकाचा शोध महत्त्वाचा ठरणार आहे.

वनस्पतीच्या एखाद्या पानांच्या टोकावर भुकेल्या अळीने हल्ला केल्यास, तो संदेश उर्वरित सर्व वनस्पती अवयवापर्यंत काही सेकंदात पोचतो. या वेगवान विद्युत आणि रासायनिक संदेशासाठी वनस्पतींच्या पेशीतील कॅल्शियमचा उपयोग होतो. अत्यंत वेगाने तो संदेश अन्य पानांपर्यंत पोचवला जातो. परिणामी, भविष्यातील अळी किंवा अन्य हल्ल्यासाठी पानांची तयारी सुरू होते. या संदेशाच्या प्रवासाचे अनेक व्हिडिओ विस्कॉन्सिन -मॅडीसन विद्यापीठातील वनस्पतीशास्त्राचे प्रा. सिमॉन गिलरॉय यांनी मिळवले आहेत. जखमी झालेल्या वनस्पतींमध्येही प्राण्यांप्रमाणेच ग्लुटामेट या चेतासंवेदकांमुळे कॅल्शिअमचा एक तरंग कार्यान्वित होतो. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले.

प्रा. सिमॉन गिलरॉय यांच्या प्रयोगशाळेमधील पोस्ट डॉक्टरल संशोधक मासात्सुगू टोयोटा (आता जपान येथील सायतामा विद्यापीठामध्ये कार्यरत) यांच्यासह जपान शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्था, मिशीगन राज्य विद्यापीठ आणि मिसौरी विद्यापीठ येथील संशोधकांनी एकत्रितरीत्या याविषयावर संशोधन केले आहे. संशोधनाविषयी माहिती देताना गिलरॉय म्हणाले, की वनस्पतीमध्ये प्रतिकारकतेला चालना देणारी एखादी सुव्यवस्थित संदेश प्रणाली असल्याचा अंदाज बहुतांश सर्व वनस्पतीशास्त्रज्ञांना आहे. मात्र, ही प्रणाली नेमकी कशी कार्य करते, हे फारसे ज्ञात नाही. जर एखाद्या पानाला इजा झाली, तर तेथून एक विद्युत भार तयार होतो, त्याचा प्रसार सर्व वनस्पतींमध्ये होतो. मात्र, या भाराला कार्यान्वित करणारे घटक आजवर अज्ञात होते.

असे आहे संशोधन

  • कॅल्शिअम हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. पेशींमध्ये सर्वव्यापी असलेले कॅल्शिअम हे पर्यावरणातील बदलांच्या संदेशाप्रमाणे कार्य करते. कॅल्शियम विद्युत भाराचे वहन करत असल्याने, त्यात क्षणभंगुर असा विद्युत संदेशही तयार होऊ शकतो. संशोधकांनी कॅल्शिअमच्या प्रमाणामध्ये होणाऱ्या बदलाला प्रत्यक्ष वेळेनुसार जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. टोयोटा यांनी कॅल्शिअम भोवती असताना चमकणारे प्रथिने तयार करणारी वनस्पती बनवली. त्यामुळे कॅल्शिअम आणि त्याचे प्रमाण यावर लक्ष ठेवणे शक्य झाले. त्यानंतर अळीचा हल्ला, कात्रीने कापणे आणि चुरगाळल्यामुळे होणाऱ्या जखमा यासाठी वनस्पतीचा प्रतिसाद मिळवण्यात आला. या प्रत्येक जखमेसाठी कॅल्शिअमचा प्रवाह जखमेपासून अन्य पानांपर्यंत पोचत असल्याचे दिसून आले. त्याचा वेग १ मिलिमीटर प्रतिसेकंद असतो. साधारणपणे दोन मिनिटांमध्ये अन्य पानांपर्यंत संदेश पोचलेला असतो. पुढील काही मिनिटांमध्ये संरक्षणासाठी आवश्यक संजीवकांच्या निर्मितीला चालना मिळते. पानांमध्ये तीव्र अशा रसायनांचा पाझर होऊ लागतो. परिणामी, भविष्यामध्ये अधिकचे हल्ले टाळले जातात.
  • पूर्वीच्या अभ्यासामध्ये स्विस शास्त्रज्ञ टेड फार्मर यांनी प्राणी आणि वनस्पती या दोन्हींमध्ये आढळणाऱ्या ग्लुटामेट या अमिनो आम्लाचे ग्रहण करण्यावर आधारित संरक्षण प्रणालीविषयी भाष्य केले होते. त्यात विद्युत संदेशाचाही उल्लेख होता. फार्मर यांनी ग्लुटामेट ग्रहण यंत्रणा नसलेल्या म्युटंट वनस्पतीमध्ये अशी धोक्याचे विद्युत संदेश पाठवले जात नसल्याचेही दाखवून दिले होते.
  • टोयोटा आणि गिलरॉय यांना अशा म्युटंट वनस्पतींमध्ये जखमा झाल्यानंतर कॅल्शिअमचा प्रवाह वाहत असल्याचे आढळले.
  • सामान्य वनस्पतीमध्ये जखमा झाल्यानंतर हा चमकदार कॅल्शिअमचा प्रवाह तेजस्वी दिसतो. तर म्युटंट वनस्पतीमध्ये तो मध्येमध्ये विजेरीप्रमाणे हलका चमकतो.
  • यावरून जखमेच्या परिसरात ग्लुटामेट तयार होऊन, त्यामुळे संपूर्ण वनस्पतींमध्ये कॅल्शिअमच्या प्रवाहाला चालना मिळते.
  • वनस्पतींमध्ये कोणतीही चेतासंस्था नसतानाही जैवरासायनिक क्रियांद्वारे संरक्षण प्रणाली कार्यान्वित होते.

या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ खालील लिंकवरून पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=Lzq-wRHCTKc
 

इतर अॅग्रो विशेष
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...