agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Carbon reserves in Central American soils still affected by ancient Mayan deforestation | Agrowon

माया संस्कृतीतील जंगलतोडीचे दिसतात मातीवर परिणाम
वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मानव प्राचीन काळापासून निसर्गामध्ये हस्पक्षेप करत आला आहे. माया संस्कृती नष्ट होऊनही एक हजारापेक्षा अधिक वर्षे उलटली आहेत. मात्र, या काळातील युकॅटन पेनिनसुला प्रांतातील जंगल तोड आणि त्याचे जमिनीच्या कर्ब साठवणीवर झालेले परिणाम अद्यापही मध्य अमेरिकेतील कर्ब साठ्यावर दिसून येत असल्याचे मॅकगिल विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर जिओसायन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

मानव प्राचीन काळापासून निसर्गामध्ये हस्पक्षेप करत आला आहे. माया संस्कृती नष्ट होऊनही एक हजारापेक्षा अधिक वर्षे उलटली आहेत. मात्र, या काळातील युकॅटन पेनिनसुला प्रांतातील जंगल तोड आणि त्याचे जमिनीच्या कर्ब साठवणीवर झालेले परिणाम अद्यापही मध्य अमेरिकेतील कर्ब साठ्यावर दिसून येत असल्याचे मॅकगिल विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर जिओसायन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

मातीची सुपीकतेमध्ये सध्या केलेल्या हस्तक्षेपाचे परीणाम भविष्यात दीर्घकाळ जाणवत राहतात. माया संस्कृतीमध्ये सुमारे ४ हजार वर्षापूर्वी शेतीला सुरूवात झाली. शेतीचा वाढता प्रसार व शहरे वसवण्यासाठी जंगलांची तोड मोठ्या प्रमाणात झाली. सोबत मातीची धूपही होत गेली. या प्रांतातील मातीमध्ये कर्बाच्या साठ्यावर झालेल्या परीणामाच्या तीव्रतेतून इतक्या वर्षानंतर माती सावरली नसल्याचे मॅकगिल विद्यापीठातील भूरसायनशास्त्रज्ञ पीटर डग्लस यांनी नव्याने केलेल्या संशोधनात दिसून आले.

भूपर्यावरणामध्ये मूलभूत बदल ः
पृथ्वीवरील कार्बनचा सर्वात मोठा साठा मातीमध्ये आहे. ते प्रमाण वातावरणातील कार्बनच्या जवळपास दुपटीइतके भरते. असे असूनही कर्ब साठ्याविषयी अनेक बाबी मानवाला अज्ञात आहेत. त्यात झालेले बदल मुळ स्थितीमध्ये येण्यासाठी अनेक शतकांपेक्षा अधिक काळ लागतो. इतक्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास करण्यासाठी डग्लस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिण मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथील माया खोऱ्यातील तीन तलावातील गाळांनी बनलेल्या मातीचे विश्लेषण केले. रेडिओकार्बनच्या (आयसोटोप) मापनातून त्याचा काळ, मातीत गाडल्या गेलेल्या वनस्पतीच्या मेणासारख्या मूलद्रव्यावरून त्यांचे वय मिळवण्यात आले. त्याचा तुलनात्मक अभ्यास केला. मातीत कार्बनची साठवण ही अत्यंत अलिकडची असल्याचे दिसून आले. पीटर डग्लस म्हणाले, की आपण जेव्हा या प्रदेशाला भेट देतो, तेव्हा वर्षावनातील जुन्या व घनदाट झाडीकडे लक्ष जाते. मात्र, जेव्हा मातीतील कार्बन साठ्याकडे पाहतो, त्यावेळी त्यात झालेले मूलभत बदल दिसून येतात. इतक्या प्रचंड वर्षानंतरही ते मुळ स्थितीत न आल्याचे स्पष्ट होते.

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...