चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर भर

चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर भर
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर भर

चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते. निर्यातीच्या अनुषंगाने मागणीनुसार विविध प्रकारच्या सफरचंदाची खास लागवड आहे. उदा. रशियन बाजारपेठेमध्ये खास पिवळ्या सोनेरी (यलो गोल्ड) सफरचंदाची मागणी असते, तर बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये लाल (रेड गोल्ड) विकली जातात. रुस्टर रेड जातीला आग्नेय आशियामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. सर्व सफरचंद जातींमध्ये रेड फुजी ही सर्वाधिक लोकप्रिय असून, त्याची विक्री आग्नेय आशिया, रशिया, कॅनडा, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका येथे होते. चीन येथील दालियन मेन्यू फूड कंपनीचे फळांचे उत्पादन आणि कॅनड फूड निर्मिती असे दोन व्यवसाय आहेत. १९८० पासून सफरचंदाची निर्यात करत असून, या वर्षी निर्यातक्षम उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. पर्यायाने स्थानिक बाजारपेठेमध्ये दर घसरण्याची शक्यता आहे. अर्थात, यात काही बदल अपेक्षित आहेत. यशस्वी कंपन्या नेहमी उत्पादनाच्या दर्जाकडे लक्ष देतात. त्यातून बाजारामध्ये दबदबा कायम ठेवता येतो. कंपनीचे संचालक चेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कंपनी या सफरचंदासोबत रेड ग्लोब द्राक्षाची निर्यात थायलंड आणि आग्नेय आशियाई देशामध्ये करते. गेल्या काही वर्षांमध्ये निर्यातीमध्ये अडचणी आहेत. १. स्थानिक बाजारपेठेमध्ये तीव्र स्पर्धा आहे. २. निर्यातीसाठीचे कर आणि अन्य खर्च यांचे प्रमाण अधिक आहे. ३. निर्यातीसाठी महत्त्वाच्या देशांनी राबवलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार बंधनांमुळे चीन येथील निर्यातकारांसाठी अडचणीच्या स्थिती निर्माण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com