आता खाण्यातही क्रिकेट!
आता खाण्यातही क्रिकेट!

आता खाण्यातही क्रिकेट !

क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या नावाचा कीटकही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा वापर मानवी आहारामध्ये केला जात आहे. त्यापासून चॉकलेटसह विविध पदार्थ अमेरिकेसह विविध देशात तयार केले जातात. हे पदार्थ पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूसाठी चांगले असून, त्याच्या आहारातील समावेशाने आतड्याचा दाह कमी होण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच अमेरिकेत झालेल्या संशोधनामध्ये पुढे आले आहे. कीटक हे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आरोग्यदायी मेदाने परिपूर्ण असतात. पारंपरिक पशुमांसाच्या तुलनेमध्ये कीटक अधिक पर्यावरणपूरक ठरू शकतात. सध्या जगभरातील सुमारे दोन अब्ज लोकांच्या आहारामध्ये कीटकांचा समावेश आहे. युरोप आणि अमेरिकेमध्येही त्याकडे लोकांचा कल वाढत आहे. विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातील नेल्सिन पर्यावरण अभ्यास संस्थेमध्ये कीटकांच्या आहारातील वापराच्या वैद्यकीय चाचण्या नुकत्याच घेण्यात आल्या आहेत. संशोधिका व्हेलेरी स्टल यांनी सांगितले की, क्रिकेटयुक्त आहार मानवी पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी फायद्याचा ठरतो. अगदी मोठ्या प्रमाणात खाल्ले तरी कोणताही अपाय न होता उलट आतड्यातील दाह कमी होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com