agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, European badgers' gut bacteria may be a powerful ally in the fight against tuberculosis | Agrowon

पाळीव प्राण्यांतील क्षयरोगाला रोखण्यासाठी पचनसंस्थेतील जिवाणूंचे अस्त्र
वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

युरोपियन बॅडगर या प्राण्याच्या पचनसंस्थेतील सूक्ष्म जिवाणू हे क्षयरोगाशी सामना करण्याच्या लढाईतील प्रमुख अस्त्र ठरू शकत असल्याचे सरे विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. हे संशोधन गाईंसह विविध पाळीव प्राण्यांतील क्षयरोगाच्या उद्रेकाशी सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संशोधनासाठी मॉरिस अॅनिमल फाउंडेशनने अर्थसाह्य केले आहे.

युरोपियन बॅडगर या प्राण्याच्या पचनसंस्थेतील सूक्ष्म जिवाणू हे क्षयरोगाशी सामना करण्याच्या लढाईतील प्रमुख अस्त्र ठरू शकत असल्याचे सरे विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. हे संशोधन गाईंसह विविध पाळीव प्राण्यांतील क्षयरोगाच्या उद्रेकाशी सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संशोधनासाठी मॉरिस अॅनिमल फाउंडेशनने अर्थसाह्य केले आहे.

युरोपियन बॅडगर आणि गाई यामध्ये काय साम्य आहे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, क्षयरोगाशी संबंधित अनेक प्रजातींच्या गुंतागुंतीच्या जाळ्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका निभावतात. बॅडगर हे मायकोबॅक्टेरियम बोव्हाइस या जिवाणूंचे वाहक असल्याचे ज्ञात असून, पाळीव प्राण्यांमध्ये क्षयरोगाच्या प्रसाराच्या मुळाशी ते असल्याचे मानले जाते. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी माणसांमध्ये क्षयरोगावर वापरले जाणारे बॅसिलस कॅलमेट्टे- गुरीयम हे औषध बॅडगरसाठी वापरणे हा दीर्घकालीन पर्याय मानला जातो. मात्र, त्याची अंमलबजावणी कार्यक्षमपणे करण्यामध्ये अडचणी आहेत. ब्रिटन येथील सरे विद्यापीठातील संशोधक डॉ. जॉर्ज गुटीईर्रेझ यांनी प्राणी आणि वनस्पती आरोग्य संस्थेच्या सहकार्याने या त्रुटी दूर करण्यासाठी संशोधन केले आहे. त्यामध्ये या औषधाची परिणामकारकता कमी करण्यामध्ये बॅडगरच्या पचनसंस्थेतील जिवाणू आढळला आहे. त्याचप्रमाणे हे जिवाणू क्षयरोगासाठी कारणीभूत जिवाणूंना मारण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतील, असेही निष्कर्ष मिळाले आहेत. एकाच वेळेला क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी चांगली आणि वाईट बातमी असल्याचे मत गुटीईर्रेझ व्यक्त करतात. हे निष्कर्ष बीएमसी मायक्रोबायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

संशोधनातील महत्त्वाचे...

  • सध्या ब्रिटन येथील क्षयरोग निर्मूलनामध्ये प्रामुख्याने गाईंची वाहतूक रोखणे, वन्य प्राण्यांशी संपर्क न होऊ देणे यासोबतच बॅडगरची कत्तल करण्यापर्यंत विविध घटकांचा समावेश आहे. वन्य प्राण्यांपासून गाई दूर ठेवणे हे पशू व्यवस्थापकांसाठी आव्हानात्मक असते. कारण बॅडगर हे प्राणी त्यांच्या रहिवासामध्ये कळपाने वावरत असतात. त्यांची कत्तल करणे किंवा त्यांना त्यांच्या रहिवासातून हाकलून लावणे यामुळे या प्राण्याच्या सामाजिक संरचनेमध्ये अडथळे निर्माण करणारे असते. त्यामुळे क्षयरोगाने बाधित अशा सर्व प्राण्यांसाठी कार्यक्षम लस तयार करण्याचे धोरण आखले जात आहे. हे पर्यावरणासाठीही पूरक ठरू शकते.
  • पचनसंस्थेतील नैसर्गिक जिवाणू हे आपल्या प्रतिस्पर्धी जिवाणूंना मारतात किंवा त्यांच्यासाठी अडचणीची स्थिती निर्माण करतात. डॉ. गुटीईर्रेझ यांना बॅडगरच्या पचनसंस्थेमध्येही असाच प्रकार घडत असल्याचे आढळले आहे.
  • त्यांच्या गटाने पचनसंस्थेतील अनेक नैसर्गिक जिवाणू विशेषतः लॅक्टिक आम्ल जिवाणू त्यांच्या विष्ठेमधून वेगळे केले आहेत. त्यातील काही जिवाणू बीसीजी औषधांचा परिणाम कमी करतात.
  • क्षयरोगाने प्रादुर्भावग्रस्त बॅडगरच्या विष्ठेमध्ये प्रामुख्याने क्षयरोगकारक एम. बोव्हाइस जिवाणू आढळतात. मात्र, पचनसंस्थेतील अन्य काही जिवाणू या क्षयरोगकारक जिवाणूंना मारत असतात. नैसर्गिकरीत्या त्यांचे प्रमाण कमी होत असते. बॅडगरच्या पचनसंस्थेमध्ये आढळलेले लॅक्टिक आम्ल हे त्यांची प्रतिकारकशक्ती वाढवण्यामध्ये मदत करत असल्याचेही दिसून आले. त्यांच्यामुळे औषधांची परिणामकारकता वाढू शकते.
  • सध्या काही प्राण्यांमध्ये कार्यक्षम ठरणारी औषधे अन्य काही प्राण्यांमध्ये अकार्यक्षम ठरतात. त्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी पचनसंस्थेतील नैसर्गिक जिवाणूंबाबत अधिक माहिती मिळवली जात आहे.

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...