agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, For the first time, scientists are putting extinct mammals on the map | Agrowon

सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा केला तयार
वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प्राण्यांच्या सर्व कुळ व वंशविस्ताराचा एकत्रित असा नकाशा तयार केला आहे. त्यामध्ये सध्या जिवंत आणि नुकत्याच नष्ट झालेल्या सुमारे ६ हजार सस्तन प्रजातींचा समावेश आहे. प्राण्याची सध्या उपलब्ध असलेले स्थान आणि भविष्यामध्ये जर ती प्रजाती लुप्त न झाल्यास ती नेमकी कुठे आढळेल, याविषयी नकाशातून माहिती उपलब्ध होऊ शकते. जागतिक पातळीवरील जैवविविधतेचे एकूण पॅटर्न समजण्यासाठी या नकाशाचा उपयोग होईल. हा अभ्यास ‘इकॉलॉजी’ या शास्त्रीय मॅगेझीनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या सस्तन प्राण्यांच्या सर्व कुळ व वंशविस्ताराचा एकत्रित असा नकाशा तयार केला आहे. त्यामध्ये सध्या जिवंत आणि नुकत्याच नष्ट झालेल्या सुमारे ६ हजार सस्तन प्रजातींचा समावेश आहे. प्राण्याची सध्या उपलब्ध असलेले स्थान आणि भविष्यामध्ये जर ती प्रजाती लुप्त न झाल्यास ती नेमकी कुठे आढळेल, याविषयी नकाशातून माहिती उपलब्ध होऊ शकते. जागतिक पातळीवरील जैवविविधतेचे एकूण पॅटर्न समजण्यासाठी या नकाशाचा उपयोग होईल. हा अभ्यास ‘इकॉलॉजी’ या शास्त्रीय मॅगेझीनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

पृथ्वीवरील जैवविविधतेसंदर्भात सातत्याने काम करण्याची आवश्यकता आहे. वातावरणातील बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे जैवविविधतेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होत आहेत. त्याचाही आढावा नव्या सस्तन प्राण्यांच्या संदर्भात घेण्यात आला. त्या विषयी माहिती देताना स्वीडन येथील गोथेनबर्ग विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ सोरेन फॉरबे यांनी सांगितले, की सामान्यतः सस्तन प्राण्यांच्या नकाशांचा वापर जैवविविधतेचे विविध पॅटर्न आणि हवामानातील बदलांचा प्रजातींवर होणारा परिणाम तपासण्यासाठी केला जातो. सध्याचे नकाशे हे अपूर्ण असून, त्यात प्रजातींचे नैसर्गिक रहिवास स्थान दर्शवण्यात येत नाही. अनेक प्रजातींची संख्या माणसांच्या हस्तक्षेप विशेषतः शिकार आणि रहिवास नष्ट करण्यामुळे कमी होत आहे. तपकिरी अस्वल हे प्रामुख्याने अलास्का किंवा रशियातील मानले जाते. मात्र, त्यांच्या रहिवासाचे स्थान मेक्सिको ते उत्तर आफ्रिकेपर्यंत पसरलेले आहे. जर आपल्याला उष्ण होत असलेल्या वातावरणाचे त्यावरील परिणाम जाणून घ्यावयाचे असतील, तर त्यांचा नैसर्गिक रहिवास ज्ञात असणे गरजेचेच असेल. तस्मानियन टायगर, वुली मॅमथ यांच्यासारख्या लुप्त होत असलेल्या विविध सस्तन प्राण्यांचाही समावेश या नकाशामध्ये केला आहे.

  • शिकारीमुळे केवळ शंभर वर्षामध्ये तस्मानियन टायगर नष्ट होणाऱ्या प्रजातींमध्ये समाविष्ठ झाला.
  • आफ्रिकेतील हत्ती किंवा सिंहासारखे प्राणी मोठे सस्तन म्हणून आज ओळखले जात असले तरी त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे प्राणी गेल्या ३० दशलक्ष वर्षांमध्ये पृथ्वीवरून नष्ट झाले आहेत.
  • आज प्राचीन वाटणारा वुली मॅमथ हा मोठा सस्तन प्राणीही पिरॅमीडच्या काळापर्यंत जिवंत होता.

    जुने नकाशे, नवी सूत्रे ः
    प्रत्येक प्रजातींच्या माहिती साठ्याचे एकत्रिकरण हे सोपे नव्हते. आर्हस विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने अनेक महिन्यांपर्यंत काम करून, तो एकत्र जुळवला. त्यातील रिकाम्या राहणाऱ्या जागा भरून घेतल्या. आज पृथ्वीवर शिल्लक नसलेल्या प्रजातीही वंशवेलीमध्ये अंतर्भूत केल्या. त्यासाठी डीएनए पुरावे, जिवाश्म सापडणाऱ्या जागा यावरून रहिवासाची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (...
जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (...
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
ज्वारीस द्या संरक्षित पाणीसर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात...
गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी...प्रकाश संश्लेषणामध्ये हरितलवक आणि हरितद्रव्य...
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...