agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Fluctuating personal income may be associated with an increased heart disease risk | Agrowon

उत्पन्नातील चढ-उतारामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो दुपटीने
वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

तरुण, प्रौढांमध्ये पंधरा वर्षाच्या काळात दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आर्थिक उत्पन्नामध्ये लक्षणीय घट झाल्यास हृदयरोगाचा धोका दुपटीने वाढत असल्याचे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नल सर्क्युलेशनमध्ये मांडण्यात आले आहे.

तरुण, प्रौढांमध्ये पंधरा वर्षाच्या काळात दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आर्थिक उत्पन्नामध्ये लक्षणीय घट झाल्यास हृदयरोगाचा धोका दुपटीने वाढत असल्याचे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नल सर्क्युलेशनमध्ये मांडण्यात आले आहे.

अमेरिकेमध्ये वाढत असलेल्या आर्थिक दरीमुळे मोठ्या लोकसंख्येला गरिबीचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश लोकांच्या उत्पन्नामध्ये बदल होणे, घट होणे यांचे प्रमाण १९८० नंतर उच्च पातळीपर्यंत वाढले आहे. अशा प्रकारे वैयक्तिक उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी घट ही आरोग्यासाठी हानिकारक असून, हृदयरोग, पक्षाघात अशा आजारांचे प्रमाण दुपटीने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यात महिला आणि आफ्रिकी अमेरिकन लोकांमध्ये गोऱ्या पुरुषांच्या तुलनेमध्ये घट होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याविषयी माहिती देताना फ्लोरिडा येथील मियामी विद्यापीठातील औषधशास्त्र विद्यालयातील संशोधक टॅली एलफास्सी यांनी सांगितले, की आर्थिक उत्पन्नाच्या अशाश्वतीमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका पोचत आहे. विशेषतः सार्वजनिक कार्यक्रमाने अशा बदलांचे धक्के शोषून घेतले नाहीत, तर माणसामध्ये सातत्याने होणारे बदल आणि घटीमुळे फटका बसू शकतो.

असा झाला अभ्यास

  • अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात केवळ निरीक्षणावर आधारीत निष्कर्ष काढले असून, त्यात कोणत्याही कार्यक्रमांचे विश्लेषण करण्यात आलेले नाही. यात केवळ आर्थिक उत्पन्नामध्ये होणाऱ्या तीव्र चढ-उतारांचे हृदयाचे आरोग्य आणि त्यामुळे होणारे अकाली मृत्यू यावर लक्ष केंद्रित केले होते.
  • अमेरिकेतील बिर्मिंगहॅम (अलाबामा), मिन्नेपोलिस (मिन्नेसोटा), शिकागो (इल्लिनॉईज), ओकलॅंड (कॅलिफोर्निया) अशा टाक वेगवेगळ्या शहरांतील ३९३७ लोकांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासाला सुरुवात झाली, त्या वेळी (१९९० मध्ये) हे सर्व २३ ते ३५ वयोगटातील होते. १९९० पासून २००५ पर्यंत उत्पन्नामध्ये घडणाऱ्या बदलांची पाच वेळा माहिती गोळा केली. जर उत्पन्नामध्ये २५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक घट झाली असल्यास त्याच्या वेगळ्या नोंदी घेतल्या गेल्या. पुढे २००५ ते २०१५ या काळात संशोधकांनी त्या लोकांबाबत हृदय आणि त्याविषयी घडलेल्या घटना किंवा घडलेले मृत्यू यांचा अभ्यास केला.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...