agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Fungus provides powerful medicine in fighting honey bee viruses | Agrowon

विषाणूंपासून मधमाश्यांच्या बचावासाठी अळिंबीचा अर्क उपयुक्त
वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

अळिंबीचा अर्क मधमाश्यांना खाद्यामध्ये दिल्यास विषाणूंच्या प्रादुर्भावाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधनात दिसून आले आहे. प्रक्षेत्रावरील चाचण्यामध्ये मधमाश्यांच्या वसाहतीमध्ये मायसेलियम अर्काचा वापर केल्या डिफार्मड विंग व्हायरस आणि लेक सिनाई व्हायरस यांच्या प्रादुर्भावामध्ये प्रचंड घट झाल्याचे दिसून आले. नियंत्रित वसाहतीच्या तुलनेमध्ये ही घट अनुक्रमे ७९ पट आणि ४५ हजार पट इतके अधिक होती. यामुळे मधमाश्यांच्या वसाहतींचे विषाणूपासून संरक्षण करण्याचा विश्वास मिळाला आहे.

अळिंबीचा अर्क मधमाश्यांना खाद्यामध्ये दिल्यास विषाणूंच्या प्रादुर्भावाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधनात दिसून आले आहे. प्रक्षेत्रावरील चाचण्यामध्ये मधमाश्यांच्या वसाहतीमध्ये मायसेलियम अर्काचा वापर केल्या डिफार्मड विंग व्हायरस आणि लेक सिनाई व्हायरस यांच्या प्रादुर्भावामध्ये प्रचंड घट झाल्याचे दिसून आले. नियंत्रित वसाहतीच्या तुलनेमध्ये ही घट अनुक्रमे ७९ पट आणि ४५ हजार पट इतके अधिक होती. यामुळे मधमाश्यांच्या वसाहतींचे विषाणूपासून संरक्षण करण्याचा विश्वास मिळाला आहे. हे संशोधन ‘जर्नल सायंटिफीक रिपोर्टस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मधमाश्यांच्या वसाहती वेगाने नष्ट होण्यामध्ये अन्य कारणांसोबतच विषाणूंचा प्रादुर्भाव हे महत्त्वाचे कारण असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. वसाहतीमध्ये होणारा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने संशोधन होत आहे. त्याविषयी माहिती देताना वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ स्टिव्ह वेब्राईट यांनी सांगितले, की व्हॅरोवा कोळ्यामुळे मधमाश्यांमध्ये पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांचा फटका वसाहतींना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मधमाश्यांच्या खाद्यामध्ये अधिक पोषक घटकांच्या वापराचे प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये अळिंबीच्या अर्काचे फायदे होत असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत.

कोळी आणि विषाणू यांचे संबंध

  •  वॉल्टर शेफर्ड यांनी सांगितले, की व्हॅरोवा कोळ्यामध्ये मधमाश्यांसाठी दुहेरी धोका असतो. ते विषाणूंचा प्रसार करतात. तसेच त्यांच्यामुळे मधमाश्यांच्या प्रतिकार क्षमतेवर  ताण निर्माण होतो. तसेच त्या विषाणूंच्या प्रादुर्भावासाठी अधिक संवेदनशील होतात. परिणामी कामकरी माश्यांचा आयुष्यकाळ कमी होतो.
  •  हे संशोधन शेफर्ड यांची प्रयोगशाळा आणि फंजाय परफेक्टी या खासगी संस्थेच्या भागीदारीतून करण्यात आले. या संस्थेचे संस्थापक पॉल स्टॅमेट यांनी आधी मायसेलियल अर्काचे विषाणूरोधक गुणधर्माचा मानवी पेशींवरील परिणामांचा अभ्यास केला आहे.
  •  व्हरोवा कोळ्यामुळे गेल्या दशकामध्ये प्रति वर्ष सरासरी ३० टक्क्यांपर्यंत घट होत असल्याचे दिसून आले. त्यांच्यामुळे प्रसार होणारे विषाणू यांचा फटका मोठा असतो. पंखामध्ये विकृती निर्माण होते. कामकरी माश्यांचे आयुष्य कमी होते.
  •  लेक सिनाई विषाणूही व्हॅरोवा कोळ्याची संबंधित असून, त्याचा अमेरिकेमध्ये मोठा प्रसार होत आहे. या विषाणूची बाह्य कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी अधू होणे, आजारी पडणे आणि अशक्त होणे अशा बाबी दिसून येत असल्याचे सहायक संशोधन प्रो. ब्रॅण्डन हॉपकिन्स यांनी सांगितले.

बुरशींची प्रक्रिया
या प्रयोगामध्ये मायसेलियल अर्काची तोंडावाटे प्रक्रिया करण्यात आली. विशेषतः व्हॅरोवा कोळ्यांचा प्रादुर्भाव असलेल्या लहान मधमाशी सुमारे एक डझन वसाहतींमध्ये हा प्रयोग करण्यात आला. शेपर्ड यांनी सांगितले, की ही प्रक्रिया तुलनेने सोपी असून, मोठ्या वसाहतींचा वर्षभर पाठपुरावा करण्यात आला. त्यातून अर्काचा वापर कसा करावयाचा, याविषयी शिफारशी तयार केल्या आहेत.

 

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...