‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय विश्लेषण

‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय विश्लेषण
‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय विश्लेषण

कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो. सोहैल महमूद व त्यांच्या गटाने लॅव्हेंडर (शा. नाव - Lavandula angustifolia) या वनस्पतीचे जनुकीय विश्लेषण केले आहे. त्यातील तैलघटक, सुगंधी द्रव्ये महत्त्वाची असून, ही वनस्पती स्वच्छता, औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते. लॅव्हेंडर ही वनस्पती अनेक कारणांनी महत्त्वाची आहे. कारण ती दुष्काळ सहनशील आहे. किडींनाही प्रतिकारक आहे. त्याचबरोबर तिचा सुगंध सर्वांना आकर्षित करणारा आहे. या वनस्पतीचे तेल व अन्य घटकांचे व्यावसायिक मूल्यही अब्जावधी डॉलरचे आहे. त्यामुळे असे सारे गुणधर्म वनस्पतीशास्त्रज्ञानाही या वनस्पतीच्या अभ्यासासाठी उद्युक्त करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून या वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या प्रो. सोहैल महमूद यासह ब्रोक विद्यापीठातील प्रो. पिंग लियांग आणि डॉक्टरल विद्यार्थी रादेश एन. मल्ली व सहकाऱ्यांनी लॅव्हेंडरचे जनुकीय संरचनेचा अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष ‘प्लॅंटा’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com