agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Global warming increases wildfire potential damages in Mediterranean Europe | Agrowon

युरोपातील वणव्यांचा तापमान वाढीशी जोडला संबंध
वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

मध्य युरोपमधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणणे शक्य झाल्यास जागतिक तापमानाची वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादीत ठेवणे शक्य असल्याचे बार्सिलोना विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मध्य युरोपमधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणणे शक्य झाल्यास जागतिक तापमानाची वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादीत ठेवणे शक्य असल्याचे बार्सिलोना विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मध्य युरोपमधील अनेक देशांमध्ये जंगलामध्ये काही ठराविक हंगामामध्ये वणवे लागतात. त्याचे जंगल, त्यातील सजीवांसह पर्यावरणावरही विपरीत परीणाम होतात. बार्सिलोना विद्यापीठातील संशोधक मार्को तुर्को आणि त्यांच्या गटाने केलेल्या या अभ्यासामध्ये सन २०१७ आणि २०१८ मध्ये युरोपातील वणवे लागण्याच्या हंगामामध्ये तापमानात होणाऱ्या वाढीचा अभ्यास करण्यात आला. वणव्यांमुळे होणाऱ्या मानवी, आर्थिक आणि पर्यावरणीय नुकसानीचा अंदाज घेण्यात आला. त्यासाठी विविध प्रादेशिक हवामान आकडेवारी व अंदाजांचा विचार करण्यात आला. यात युरोपमधील काही प्रांत विशेषतः ग्रीस, पोर्तुगाल, स्वीडनमधील मोठ्या वणव्यांचा परिणाम तीव्र दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांमध्ये होत असल्याचे दिसून आले.

  • जागतिक तापमानातील १.५ अंश सेल्सिअस या वाढीपैकी सुमारे ४० टक्के वाढ ही वणव्यामुळे होणाऱ्या उष्णता वाढीशी जोडता येते. यात भविष्यात होणाऱ्या वाढीचा विचार करण्यात आलेला नाही. मात्र, भविष्यामध्ये तापमानामध्ये दुप्पटीने वाढ झाल्यास हे प्रमाण १०० टक्क्यापर्यत वाढू शकते.
  • सध्या जंगलाच्या व्यवस्थापनामध्ये मोठ्या वणव्यांच्या सामाजिक आणि आर्थिक बाबींचा अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. त्याअनुसार सध्याच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये धोरणात्मक बदल होणे गरजेचे असल्याचे संशोधकांचे मत आहे.

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...