agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Green mango peel: A slick solution for oil-contaminated soils | Agrowon

कैरीच्या सालाचे नॅनोकण करतील प्रदूषण कमी
वृत्तसेवा
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

कैऱ्यांच्या सालीपासून मिळवलेल्या अतिसूक्ष्म कणांचा उपयोग मातीतील तेलांचे प्रदूषण कमी करण्यासाठी होऊ शकत असल्याचे ऑस्ट्रेलियातील संशोधनामध्ये आढळले आहे. हे संशोधन ‘एनव्हायर्न्मेंट टेक्नॉलॉजी अॅण्ड इनोव्हेशन’ या पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

कैऱ्यांच्या सालीपासून मिळवलेल्या अतिसूक्ष्म कणांचा उपयोग मातीतील तेलांचे प्रदूषण कमी करण्यासाठी होऊ शकत असल्याचे ऑस्ट्रेलियातील संशोधनामध्ये आढळले आहे. हे संशोधन ‘एनव्हायर्न्मेंट टेक्नॉलॉजी अॅण्ड इनोव्हेशन’ या पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

पेट्रोलियम उद्योगासाठी तेलमिश्रित चिखलचा पुनर्वापर करणे हे तुलनेने अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक ठरते. तेल प्रक्रिया विधीमध्ये मातीत मिसळल्यामुळे सुमारे ३ ते ७ टक्के तेल वाया जाते. ते पुन्हा मिळवता येत नाही. त्या बरोबर प्रदूषणामुळे पर्यावरणाची समस्या उद्भवून परिसंस्थेची होते. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया येथील संशोधक डॉ. बिरुक देसालॅग्न यांनी याबाबत संशोधन केले आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. देसालॅग्न म्हणाले की, गेल्या वर्षी जागतिक तेल उत्पादन सर्वोच्च पातळीवर म्हणजे प्रति दिन ९२.६ दशलक्ष बॅरल प्रति दिवस पोचले. मात्र, तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा होत असूनही तेल रिफायनरीद्वारे मोठ्या प्रमाणात मातीचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामध्ये विविध विषारी आणि कर्करोगकारक घटक असतात. त्याचा अन्य सजिवाबरोबर माणसांवरही परिणाम होतो. तेलाच्या विषारीपणा आणि भौतिक गुणधर्मामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बदल होत गेले आहे. थोडक्यात, वातावरणामध्ये त्यांचे विषारी घटक निर्मितीची प्रक्रियाही बदलत आहे.

या प्रदूषणकारी घटकांच्या विघटनासाठी गेल्या काही वर्षांपासून नॅनो कणांचा वापर वाढत आहे. अशा नॅनो कणांच्या निर्मितीसाठी सध्या विविध वनस्पतीजन्य घटकांचा वापर केला जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या संशोधनामध्ये कैऱ्यांच्या सालीच्या अर्कामध्ये आयर्न क्लोराईड मिसळून त्यापासून नवीन नॅनोकण मिळवण्यात आले. हे कण तेलमिश्रित मातीच्या प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले. या कणांमुळे तेलमिश्रित मातीतील विषारी घटकांचे रासायनिक ऑक्सिडेशन प्रक्रियेद्वारे विघटन होते. परिणामी प्रदूषणकारी घटक नष्ट होतात. हे ९० टक्क्यापर्यंत कार्यक्षम असल्याचे डॉ. देसालॅग्न यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...