agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Japanese encephalitis is transmitted to pigs as rapidly in Cambodian peri-urban areas as rural areas | Agrowon

शहरी भागातही वराहातील जेई विषाणूंचा धोका वाढतोय
वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये प्राणघातक एन्सेफॅलिटीसच्या प्रसारासाठी ‘जपानीज एन्सेफॅलिटीस’ (जेई) विषाणू कारणीभूत असतो. हा पारंपरिकपणे ग्रामीण भागातील रोग असला, तरी कंबोडियातील शहरी भागामध्येही वराहांत त्याचा प्रसार वेगाने वाढत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रवाशांना लसीकरणाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. हे निष्कर्ष ‘प्लॉस निगलेक्टेड ट्रॉपिकल डिसिजेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये प्राणघातक एन्सेफॅलिटीसच्या प्रसारासाठी ‘जपानीज एन्सेफॅलिटीस’ (जेई) विषाणू कारणीभूत असतो. हा पारंपरिकपणे ग्रामीण भागातील रोग असला, तरी कंबोडियातील शहरी भागामध्येही वराहांत त्याचा प्रसार वेगाने वाढत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रवाशांना लसीकरणाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. हे निष्कर्ष ‘प्लॉस निगलेक्टेड ट्रॉपिकल डिसिजेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

‘जपानीज एन्सेफॅलिटीस’ (जेई) हा डासांद्वारे प्रसारित होतो. स्थानिक वराह हे त्याचे प्राथमिक यजमान असले, तरी बहुतांशी पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, प्रतिवर्ष ६८ हजार लोकांमध्ये प्रादुर्भाव होतो. त्यातील १५ हजार लहान मुले असून, त्यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण मोठे असते. ग्रामीण भागातील विशेषतः भात शेती आणि वराहपालन होत असलेल्या प्रदेशात या रोगाचा धोका अधिक असतो. कंबोडिया येथील इन्स्टिट्यूट पाश्चर ड्यू कंबोज येथील ज्युलियट डी फ्रान्सिस्को व त्यांच्या सहकाऱ्यांनी फ्रेंच ‘अॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ (CIRAD) यांनी केलेल्या संशोधनाचा धागा पकडून अभ्यासाला सुरवात केली.

या अभ्यासासाठी २०१५ मध्ये ग्रामीण व अर्धशहरी भागातील प्रत्येकी १५ वराहांवर लक्ष केंद्रित केले. दर ८ ते ११ दिवसांनी त्यांचे रक्तनमुने घेऊन, त्याचे विश्लेषण जेई अॅण्टिबॉडीज आणि विषाणू आरएनएसाठी केले. दोन्ही गटांतील सहा महिने वयाच्या सर्व पिल्लांमध्ये जेई प्रादुर्भाव आढळला. प्रादुर्भावाचे प्रमाण दोन्हीकडेही सारखेच (अनुक्रमे ०.६१ आणि ०.६९ प्रतिदिन) आढळले. संशोधकांना जेई विषाणूंच्या सहा वेगळ्या प्रजाती आढळल्या.

थोडक्यात, कंबोडियाच्या केवळ ग्रामीणच नव्हे, तर अर्धशहरी भागातही जेई विषाणूंचा प्रादुर्भाव सारख्याच तीव्रतेने होतो. परिणामी लसीकरणासाठीच्या धोरणामध्येही बदल करण्याची आवश्यकता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

 

इतर बातम्या
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...