agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Letting the sunshine in may kill dust-dwelling bacteria | Agrowon

धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे सूर्यप्रकाशयुक्त घर
वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये जिवंत राहणाऱ्या जिवाणू नष्ट होत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल मायक्रोबाईम’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये जिवंत राहणाऱ्या जिवाणू नष्ट होत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल मायक्रोबाईम’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अंधाऱ्या खोल्यांमध्ये सरासरी १२ टक्के जिवाणू हे जिवंत राहतात आणि त्यांच्यामध्ये पुनरुत्पादनाची क्षमता ही असल्याचे ओरेगॉन विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. तुलनेमध्ये ज्या खोल्यांमध्ये दिवसाचा प्रकाश पोचतो, अशा ठिकाणी ६.८ टक्के जिवाणू जिवंत राहतात. तर अतिनील किरणांच्या संपर्कात आलेल्यापैकी ६.१ टक्के जिवाणूंमध्ये पुनरुत्पादनाची क्षमता असल्याचे दिसून आले. डॉ. फहिमीपौर यांनी सांगितले, की माणसांच्या दीर्घकाळ हा घराच्या आतमध्येच जातो. अशा ठिकाणी सातत्याने धुळीचा संपर्कही येतो. धुळीमध्ये विविध प्रकारचे जिवाणूंचा, अगदी रोगकारक जिवाणूंचाही समावेश असतो. धुळीने भरलेल्या वातावरणामध्ये राहावे लागल्यास माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

  • अंधाऱ्या वातावरणामध्ये धुळीमध्ये श्वसन रोगांशी संबंधित जिवाणू प्रजाती आढळतात. त्या सूर्यप्रकाशामध्ये असणाऱ्या धुळीमध्ये आढळत नाहीत किंवा अत्यंत कमी संख्येने आढळतात.
  • संशोधकांनी माणसांच्या त्वचेवरून मिळवलेल्या जिवाणू आणि बाह्य वातावरणातून मिळवलेले जिवाणू यांच्यावर सूर्यप्रकाशाचा होणारा परिणाम तपासला. दिवसाचा प्रकाशाचा अंतर्गत धुळीतील जिवाणूंवर बाह्य जिवाणूंच्या तुलनेमध्ये जास्त परिणाम होतो.
  • अभ्यासासाठी संशोधकांनी खऱ्या घराप्रमाणेच मात्र, वातावरण नियंत्रित अशा ११ खोल्या बनवल्या. त्यात राहत्या घरातून मिळवलेली धूळ तितक्याच प्रमाणात टाकली. त्यांच्या खिडक्यांवर चमकदार करण्याच्या तीनपैकी एक प्रक्रिया केली. त्यामुळे त्यातून दृश्य, अतिनिल प्रकाश आत जाईल किंवा अजिबात प्रकाश आत जाणार नाही. ९० दिवसांनंतर प्रत्येक खोलीतून नमुने घेऊन विश्लेषण केले. त्यातील जिवाणू जिवंत/मृत किंवा पुनरुत्पादनाची क्षमता आहेत का, तपासण्यात आले.

पारंपरिक शहाणपण
पारंपरिक शहाणपणाच्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे घरामध्ये प्रकाश, सूर्यप्रकाश आलाच आहे. त्यासाठी घरांच्या दिशा, खिडक्यांच्या दिशा ठरवल्या जात. मात्र, त्यामागील नेमक्या विज्ञानाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न संशोधनातून करण्यात आला. पूर्वीच्या काळी युरोपमध्ये काही श्वसनांशी संबंधित आजारामध्ये हवापालटांचा विशेषतः सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी जाऊन काही काळ राहण्याचा सल्ला दिला जाई. दिवसाच्या प्रकाशामध्ये धुळीतील सूक्ष्मजीवांना मारण्याची क्षमता असते. त्यामुळे शाळा, कार्यालये, रुग्णालये आणि घरांची रचना करताना या बाबींचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...