आरोग्यदायी आहारासाठी अधिक जमिनीची आवश्यकता

आरोग्यदायी आहारासाठी अधिक जमिनीची आवश्यकता
आरोग्यदायी आहारासाठी अधिक जमिनीची आवश्यकता

अमेरिकन कृषी विभागाच्या वतीने उत्तर अमेरिकनांसाठी जारी करण्यात आलेल्या आहारविषयक निकषांचा अवलंब जगभरातील लोकांनी केल्यास त्यांच्या आहारासाठी जमिनीचे क्षेत्रफळ तोकडे ठरण्याचा धोका गुयेल्फ विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. निकषानुसार आवश्यक कृषी उत्पादन मिळवण्यासाठी सुमारे १ गीगा हेक्टर अधिक क्षेत्र किंवा शेतजमिनीची (सुमारे कॅनडाच्या क्षेत्रफळाइतके) आवश्यकता भासू शकेल. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘प्लॉसवन’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. या संशोधनाविषयी माहिती देताना ‘ग्लोबल इकॉलॉजिकल चेंज अॅँड सस्टेनॅबिलिटी लॅब’च्या संचालिका प्रो. मधूर आनंद यांनी सांगितले, की जर आपण उत्तर अमेरिकनांसाठीच्या निकषाचा अवलंब केला तर त्यासाठी आवश्यक उत्पादनांच्या पूर्तीसाठी अधिक शेतजमिनीची आवश्यकता भासणार आहे. कृषी उत्पादन, आयात निर्यात यांचाही विचार केला आहे. यात केवळ सरासरी अमेरिकनांचा विचार न करता जागतिक आरोग्य, जमीन वापर आणि समानतेचा निकष वापरला.

  • प्रो. इव्हान फ्रेजर, प्रो. ख्रिस बाऊच यांच्यासह पोस्ट पीएच.डीचे विद्यार्थी ख्रिस पॅगनुट्टी, पदवीची विद्यार्थिनी साराह रिझवी यांच्या गटाने केलेल्या अभ्यासामध्ये, संशोधकांना जागतिक पातळीवर पूर्व आणि पश्चिम याविषयी भेद आढळला. पश्चिमेतील देशांमध्ये आवश्यक त्या उत्पादनाच्या पूर्ततेसाठी पूर्वेच्या तुलनेमध्ये कमी जमीन लागते.
  • फ्रेजर यांनी सांगितले, की २१ व्या शतकामधील मुख्य आव्हानामध्ये मानवी शरीराचे आरोग्य आणि एकूण उत्पादन प्रक्रियेची पृथ्वीसाठीही शाश्वत असणे गरजेचे ठरणार आहे. ग्राहक आणि उद्योग यांच्यासाठी अधिक कार्यक्षम अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यासाठी गुयेल्फ विद्यापीठामध्ये ‘फूड फॉर थॉट’ या कार्यक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com