agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Particles pull last drops of oil from well water | Agrowon

चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे पाण्यातील तेल करता येईल वेगळे
वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा प्रत्येक कण वेगळा करण्याच्या उद्देशाने चुंबकीय अब्जांशी कण (नॅनो पार्टिकल्स) विकसित केले आहेत. हे संशोधन ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ च्या ‘जर्नल एनव्हायर्नमेंटल सायन्स ः वॉटर रिसर्च अॅंड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा प्रत्येक कण वेगळा करण्याच्या उद्देशाने चुंबकीय अब्जांशी कण (नॅनो पार्टिकल्स) विकसित केले आहेत. हे संशोधन ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ च्या ‘जर्नल एनव्हायर्नमेंटल सायन्स ः वॉटर रिसर्च अॅंड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

वास्तविक पाण्यामध्ये तेल हे कधीच मिसळत नाहीत. मात्र, विहिरीमध्ये असे तेल सातत्याने घुसळले जात असल्यास ते पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थिर (इमल्सिफाइड) होते. ते वेगळे करणे अडचणीचे व सध्याच्या विविध पद्धतीद्वारेही जवळपास अशक्य मानले जाते. होस्टन येथील राईस विद्यापीठातील रसायन अभियंत्या सिबानी लिसा बिस्वाल यांनी तेलाला खेचून घेणारे नॅनो कण तयार केले आहे. त्यांच्या वापरामुळे असे इमल्सिफाइड तेल पाण्यातून सुमारे ९९ टक्क्यांपर्यंत दूर करणे शक्य होते.

सध्या प्रोडक्शन फ्लो या पद्धतीने हे पाणी वेगळ्या टाकीमध्ये घेऊन, त्यात काही रसायने आणि सरफॅक्टंट मिसळले जातात. त्याद्वारे पाण्याच्या पृष्ठभागावरील, विहिरीच्या कड्या कोपऱ्यातून तेल दाबाने खेचून घेतले जाते. मात्र, या पद्धतीमध्ये तरिही पाच टक्क्यांपर्यंत तेल पाण्यामध्ये राहते. ते ९९ टक्क्यांपर्यंत दूर करण्यासाठी बिस्वाल व त्यांच्या गटाने संशोधन केले आहे.

असे आहे तंत्र

  • राईस प्रयोगशाळेतील संशोधक क्विंग वांग यांनी चुंबकिय कण आणि अमाईन्स (धनभारीत) तयार केले होते. हे धनभारीत नॅनोकण ऋणभारीत तेलाचे कण आकर्षित करतात. तेलाच्य कणाभोवती बंध तयार केले जातात. चुंबकाच्या साह्याने हे कण पाण्याबाहेर खेचून घेतले जातात. त्या वेळी स्वच्छ पाणी खाली पुन्हा सोडले जाते.
  • अशा चुंबकीय नॅनो ट्यूबच्या निर्मितीतून प्रवाहातच प्रक्रिया करणारे रिअॅक्टर तयार करण्याचा सिबानी बिस्वाल यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे शुद्धीकरण शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग तेलकंपन्यांना होणार असला तरी पाण्याचे प्रदूषण रोखण्यामध्ये मोलाची मदत होणार आहे.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...