agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, plastic from potato starch | Agrowon

बटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची निर्मिती शक्य
वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून पर्यावरणाच्या समस्या वेगाने वाढत आहेत. अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणण्यात आली असली तरी त्याची परिणामकारकता फारशी दिसून येत नाही. प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यासाठी जैवविघटनशील प्लॅस्टिक विकसित करण्याचे प्रयत्न जगभरात होत आहे. स्वीडन येथील विद्यार्थी संशोधक पाॅँटस टॉर्नक्विस्ट याने बटाट्यातील स्टार्चच्या साह्याने प्लॅस्टिकनिर्मिती केली आहे. या संशोधनासाठी त्याला जेम्स डायसन हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून पर्यावरणाच्या समस्या वेगाने वाढत आहेत. अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणण्यात आली असली तरी त्याची परिणामकारकता फारशी दिसून येत नाही. प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यासाठी जैवविघटनशील प्लॅस्टिक विकसित करण्याचे प्रयत्न जगभरात होत आहे. स्वीडन येथील विद्यार्थी संशोधक पाॅँटस टॉर्नक्विस्ट याने बटाट्यातील स्टार्चच्या साह्याने प्लॅस्टिकनिर्मिती केली आहे. या संशोधनासाठी त्याला जेम्स डायसन हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आपल्या संशोधनाचे महत्त्व सांगताना पाॅँटस टॉर्नक्विस्ट म्हणाले, की प्लॅस्टिकच्या वापरानंतर त्याचे विघटन लवकरात लवकर होण्यावर आमचा भर होता. कारण सामान्यत प्लॅस्टिकच्या कोणत्याही वस्तूचा किंवा पॅकेजिंगचा वापर हा अत्यंत कमी काळासाठी उदा. सरासरी २० मिनिटांसाठी होतो. मात्र, टाकून दिलेले प्लॅस्टिक पर्यावरणामध्ये सुमारे ४५० वर्षे तसेच राहते. पूर्वी प्लॅस्टिक चांगला गुणधर्म मानली जाणारी ही टिकवणक्षमताच पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक ठरत असून, त्यातून अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.

असे आहे संशोधन

पाॅँटस यांने चुकणे आणि सुधारणे या प्रक्रियेतून आपले संशोधन चिकाटीने सुरू ठेवले. सुरवातीला उष्णतेच्या साह्याने विघटन होणाऱ्या प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी त्याने शेवाळांचा वापर केला. शेवाळाला काही प्रमाणात उष्णता देऊन, त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या कुकीज बनवल्या. त्याला चिकटपणा आणण्यासाठी त्यात बटाट्याच्या स्टार्चचा काही प्रमाणात वापर केला. मात्र, त्यातील द्रव खाली पडत असल्याने हे प्रयत्न सोडून द्यावे लागले. मात्र, बटाट्याचा स्टार्च चांगल्याप्रकारे वाळवल्यानंतर त्याची एकप्रकारे फिल्म तयार झाली. पुढे यावरच अधिक लक्ष केंद्रित केले. अशाप्रकारे बटाटा प्लॅस्टिकची निर्मिती झाली.
-बटाटा प्लॅस्टिक हे बटाटा स्टार्च आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार करता येते. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत गरम केले जाते. त्यानंतर योग्य त्या आकाराच्या साच्यामध्ये ओतून, त्याला उष्णता दिली जाते. त्यामुळे ते घट्ट होते. त्यातून कोरडा आणि प्लॅस्टिकची विविध भांडीही बनवता येतात.

  • साच्यामध्ये किती द्रव ओतला त्यावरून ते घट्ट, कडक किंवा पातळ फिल्म अशा स्वरूपात तयार होते.
  • योग्य उष्णता आणि आर्द्रता देऊन त्यापासून विविध वस्तू बनवता येतात. यासाठी अधिक उष्णतेची आवश्यकता नाही. त्यामुळे साचेही प्लॅस्टिकचे बनवता येतात. पर्यायाने धातूंच्या साच्याच्या तुलनेमध्ये हे साचेही स्वस्त राहू शकतील.
  • हे विघटनशील असून, त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करता येऊ शकतो. अगदी स्ट्रॉपासून प्लॅस्टिकची भांडीही बनवता येतील, असा पाॅँटस याचा दावा आहे. वापरानंतर केवळ दोन महिन्यांमध्ये त्यांचे कंपोस्ट होऊ शकते.

इतर टेक्नोवन
शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...
हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती यंत्रणादुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा...
जैवइंधनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती...सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये...
धुरळणी यंत्र फायदेशीरधुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक...
देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक...
असे करा ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा...सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग...नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍...
फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी...घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर...
शेतकऱ्यांना मिळाले क्षारपड जमिनी...उत्तर प्रदेश राज्यात हरदोई जिल्ह्यातील संताराहा...
विहीर, कूपनलिका पुनर्भरण करा, भूजल साठा...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल...
‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीकडून...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स...
कृत्रिम प्रकाशासाठी सोडियम दिव्यांच्या...परदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरलेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे,...
महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे रोटरी टोकण यंत्र हे उभ्याने ढकला पद्धतीने...
ट्रॅक्टरचलित न्युमॅटिक प्लॅंन्टरउच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचा वापर केल्याने...