agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, poultry incubators for selp help groups | Agrowon

अंडी उबवण केंद्राद्वारे बचत गट होताहेत सक्षम
वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी परसबागेलीत कोंबडी किंवा बदकपालनाला चालना देण्यात येत आहे. या व्यवसायाला उत्तम जातीची पिले उपलब्ध होण्यासाठी मुर्शिदाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने तीन उबवण केंद्रे उभी केली आहेत. यातून बचत गटाला चांगला फायदा होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी परसबागेलीत कोंबडी किंवा बदकपालनाला चालना देण्यात येत आहे. या व्यवसायाला उत्तम जातीची पिले उपलब्ध होण्यासाठी मुर्शिदाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने तीन उबवण केंद्रे उभी केली आहेत. यातून बचत गटाला चांगला फायदा होत आहे.

ग्रामीण विकासाचा विचार केल्यास महिलांचे सबलीकरण हा एक महत्त्वाचा घटक आहे. महिलांच्या विकासातून केवळ कुटंबाच्याच नव्हे, तर गाव, राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. बचत गटाच्या माध्यमातून उद्योजकतेसाठी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बचत गटाने पोल्ट्री व्यवसाय आणि बदकपालन सुरू केले असून, प्रत्येक सदस्यांना त्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महिलाच्या हाती खेळता पैसा शिल्लक राहात आहे. गरिबी, भूक आणि कुपोषण यावर मात करणे शक्य झाले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये बचत गटाद्वारे परसबागेतील कोंबडी व बदकपालनाच्या व्यवसायाला चालना दिली जात आहे. ग्रामीण भागामध्ये घरगुती कोंबडीपालनामध्ये १० ते २० पक्ष्यांपर्यंत पाळले जातात. मात्र, त्यातून कुटुंबाच्या गरजेएवढे अंडी आणि मांसाचे उत्पादन शक्य होते. अंडी व कोंबड्याच्या विक्रीतून काही प्रमाणात उत्पन्नाला सुरवात होत असल्याने त्याकडे एटीएमप्रमाणे पाहिले जाते. आवश्यकतेच्या वेळी पैसे उपलब्ध होऊ शकतात. या व्यवसायाला चालना देण्यासाठी उत्तम गुणवत्तेची कोंबडी किंवा बदकाची पिले उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र, मुर्शिदाबाद यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान संघटनेमार्फत प्रमाणित अशा तीन उबवण केंद्रांची उभारणी केली आहे. त्यामुळे परिसरातील महिलांना उत्तम गुणवत्तेची दुहेरी वापरयोग्य अशी एक दिवस वयाची पिले पुरवणे शक्य होत आहे. त्यातील एक उबवण केंद्र कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रामध्ये असून, सागरदिघी भागातील सहापूर दिघीदांगा आणि भागवांगोला येथील बलरामपूर येथे अन्य दोन उबवण केंद्रे उभी केली आहेत.

 • हे कमी क्षमतेचे पोल्ट्री इनक्युबेटर असून, प्रति बॅच ५०० अंडी उबवता येतात.
 • गॅसवर चालणाऱ्या या इनक्युबेटरचा विकास कृषी विज्ञान केंद्रामध्ये केला आहे. त्यामध्ये उबण्यासाठी आवश्यक तेवढे तापमान ठेवले जाते.
 • ग्रामीण भागातील भारनियमनाच्या काळातही हे इनक्युबेटर इनव्हर्टरवर चालते. परिणामी आवश्यक तेवढे तापमान आणि आर्द्रता टिकवणे शक्य होते.
 • अंडी उबवण्याची क्षमता उत्तम असून, अंडी उबवण्याचे प्रमाण ६७ ते ७३ टक्के इतके चांगले राहते.
 • बचत गट उबवण्यायोग्य अंडी विकत घेऊन, उबवल्यानंतर त्याची विक्री करू शकतात.
 • अनेक बचत गट बदकाची किंवा कोंबडीची एक दिवस वयाची पिले घेतात. त्यांचा सांभाळ २५ ते २८ दिवस केला जातो. या पक्ष्यांचे खाद्य व्यवस्थापन, लसीकरण योग्य प्रकारे केले जाते. पक्ष्याचे वजन १५० ते २०० ग्रॅम झाल्यानंतर त्यांची विक्री परिसरातील पशुधन विकास अधिकारी कार्यालयामध्ये मागणीनुसार ४० ते ४५ रुपये प्रतिपक्षी याप्रमाणे केली जाते. किंवा स्थानिक विक्रेत्यांकडे प्रतिपक्षी ३८ रुपयांपर्यंत दर मिळतो. साधारणतः एक बॅचच्या पालनातून ४० ते ४५ दिवसांमध्ये ४८०० ते ५००० रुपये निव्वळ नफा मिळतो. सध्या परिसारतील विविध महिला बचत गटांना उबवण केंद्राचे प्रशिक्षण, काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिला बचत गट पुढे येत आहेत.

असा आहे या व्यवसायाचा ताळेबंद

 • अंड्यांची खरेदी किंमत ः १२ रुपये प्रतिनग.
 • ५०० नगाची किंमत ः ६००० रुपये.
 • मजूर ः शक्यतो घरातील असतात.
 • खाद्याची किंमत ः (२६ र. प्रतिकिलोप्रमाणे ३५० पक्षी आणि ३० दिवस याप्रमाणे) ः ८५० रु.
 • वीजबिल आणि एलपीजी गॅस यांचा खर्च प्रतिबॅच ः ७०० रु.
 • एकूण खर्च ः ७५५० रुपये.
 • साधारणपणे ७० टक्के उबवण आणि ५ टक्के मर गृहीत धरल्यास, ३२५ पक्षी विक्रीसाठी उपलब्ध होतात. त्यांच्या विक्रीतून प्रतिपक्षी ३८ रुपयेप्रमाणे १२३५० रुपये मिळतात. त्यातून वरील ७७५० रुपये खर्च वजा केला असताना निव्वळ नफा ४८०० रुपये इतका मिळत आहे.

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
शोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...
सुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....
वातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...
‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....
तीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...
संघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...
विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...
संघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी...आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या...
भाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार...
दुष्काळात ऊस वाचविण्यासाठी ...यंदाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून...
ताजी दर्जेदार दुग्धोत्पादने हीच...सध्या दूध उत्पादकांपुढे प्रक्रिया उद्योग किंवा...
पुदिना शेतीतून मिळाला वर्षभर रोजगारमेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ...
‘दिशा’ देतेय महिला बचत गटांना आर्थिक...बुलडाणा शहरातील ‘दिशा’ महिला बचत गट फेडरेशनने...
विना नांगरणी तंत्राने खर्चात केली बचतगेल्या तीन वर्षांपासून विनामशागत तंत्रज्ञान व पीक...
डोंगर फोडून दुष्काळातही नंदनवन...सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग...
अत्यल्प पाण्यात वांग्यांचे ...जळगाव जिल्ह्यातील भोरटेक (ता. भडगाव) येथील शेतकरी...
प्रयोगशील वृत्तीतून जोपासली बहुविध...बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील...