agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Predicting how native plants return to abandoned farm fields | Agrowon

बियांच्या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी उपकरण विकसित
वृत्तसेवा
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

अनेक वनस्पतींच्या बिया या आकाराने लहान असल्यामुळे त्यांचे वितरण किंवा हालचाल यांचा मागोवा घेण्यामध्ये अनेक अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी मिन्निसोटा विद्यापीठातील संशोधकांनी विद्युत अभियांत्रिकी आणि गणितीय प्रारूपांची सांगड घातली आहे. त्यातून एक उपकरण विकसित केले आहे.

अनेक वनस्पतींच्या बिया या आकाराने लहान असल्यामुळे त्यांचे वितरण किंवा हालचाल यांचा मागोवा घेण्यामध्ये अनेक अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी मिन्निसोटा विद्यापीठातील संशोधकांनी विद्युत अभियांत्रिकी आणि गणितीय प्रारूपांची सांगड घातली आहे. त्यातून एक उपकरण विकसित केले आहे.

प्रत्येक सजीव हा आपल्या अन्नासाठी किंवा प्रजोत्पादनासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. या प्रक्रियेमध्ये त्यांची हालचाल, प्रवास किंवा स्थलांतर होत असते. मात्र, वनस्पतींची मुळे एकदा रुजली की त्यांना ती जागा सोडून जाणे शक्य होत नाही. मात्र, हीच प्रक्रिया त्यांच्या बीजाद्वारे होत असते. कोणत्याही वनस्पतींचा पर्यावरणातील अभ्यास करण्यासाठी या प्रवासाचा मागोवा संशोधक घेत असतात. मात्र, असा मागोवा घेण्यामध्ये बियांचा आकार जर खूपच लहान असल्यास अडचणी येतात. यावर मार्ग काढण्यासाठी मिन्निसोटा विद्यापीठातील जैवशास्त्र महाविद्यालयातील संशोधकांनी विद्यूत अभियांत्रिकी आणि गणितीय प्रारुपांची सांगड घातली आहे. या संशोधनाचे निष्कर्ष इकॉलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

संशोधनाविषयी माहिती देताना संशोधक अॅडम क्लार्क यांनी सांगितले, की बियांचा टर्मिनल वेग (म्हणजेच खाली पडत असताना किंवा वाऱ्यासोबत जाण्याचा स्थिर वेग) मोजण्यासाठी आम्ही उपकरण तयार केले आहे. या स्थितीमध्ये अन्य माहिती उदा. झाडाची किंवा वनस्पतीची उंची, स्थानिक वाऱ्याची दिशा व वेग अशा माहितीची सांगड घालण्यात आली. त्यातून बिया नेमक्या किती लांबपर्यंत प्रवास करू शकतील, याचा अंदाज मिळवणे शक्य होते.

  • या अशा प्रवासातूनच गेल्या नव्वद वर्षामध्ये यातील अनेक वनस्पती समुदायांनी अनेक शेते किंवा जंगलातील जागा व्यापली आहे.
  • या संशोधनामध्ये ५० प्रेअरी वनस्पती प्रजातींची माहिती गोळा करण्यात आली.
  • या अभ्यासातून केवळ वनस्पतींची वेगवेगळ्या अनुकूल ठिकाणापर्यंतचा प्रवासच उलगडत नाही, तर या वनस्पती आपल्याला खाणाऱ्या प्राण्यांपासूनही सुटका करून घेत असल्याचे दिसून आले आहे. त्याच प्रमाणे वाढीसाठी स्पर्धा कमी असलेल्या किंवा बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्यासाठी योग्य अशा स्थानाकडे मार्गक्रमण करतात, असे संशोधक लॉरेन सुल्लिव्हॅन यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...