गहू पिकाचे जनुकीय विश्लेषण, सुसंगत मांडणी पूर्ण

गहू पिकाचे जनुकीय विश्लेषण, सुसंगत मांडणी पूर्ण
गहू पिकाचे जनुकीय विश्लेषण, सुसंगत मांडणी पूर्ण

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने गहू पिकाचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण केले असून, त्याची सुसंगतवार मांडणी केली आहे. यातून गहू पिकाच्या विविध रोग आणि तापमानासाठी प्रतिकारक जातींची विकास करणे सुलभ होणार आहे. गहू हे पृथ्वीवरील विस्तृत प्रदेशामध्ये घेतले जाणारे पीक आहे. गहू पिकातून मांसाच्या तुलनेमध्ये अधिक प्रथिने पुरवली जातात. अगदी माणसाने वापरलेल्या एकूण कॅलरीचा पाचवा भाग हा गव्हातून येतो. गहू पिकाची जनुकीय संरचना हा मोठी आणि तुलनेने गुंतागुंतीची आहे. त्यात १६ अब्ज बेस जोड्या असून (त्यापासून डीएनए बनतात.) मानवी जिनोमपेक्षा पाचपटीने मोठी रचना आहे. परिणामी महत्त्वाचे खाद्यपीक असलेल्या गव्हाचे संपूर्ण विश्लेषण करणे ही प्रचंड मोठी कामगिरी असल्याचे जॉन इनस् सेंटर येथील प्रकल्प अधिकारी डॉ. क्रिस्टोबाल युयुवे यांनी सांगितले.

  • गहू हे दुष्काळ आणि पूर दोन्हीसाठी संवेदनशील आहे. प्रति वर्ष तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. तापमानातील बदलाचेही पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत. या साऱ्या समस्यावर मात करीत अधिक उत्पादक्षम, उच्च पोषणमूल्ययुक्त जातींचा विकास करण्यासाठी हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय व्हीट जिनोम सिक्वेन्सिंग कन्सॉर्टियम द्वारे हे संशोधन जर्नल सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले. जगभरातील २० देशांतील ७३ संशोधन संस्थामधील २०० पेक्षा अधिक संशोधकाचा त्याला हातभार लागला.
  • यामध्ये २१ क्रोमोसोम्स, १०७८९१ जनुके आणि ४ दशलक्षपेक्षा अधिक मुलद्रव्यीय मार्कर यांची सुसंगती लावण्यात आली. वेगवेगळ्या जनुकांच्या कार्यावर प्रभाव टाकणाऱ्या किंवा नियंत्रित करणाऱ्या घटकांविषयी माहिती उपलब्ध होणार आहे.
  • यासोबत जॉन इनस् सेंटर मधील संशोधकांनी गव्हाची जनुके कशा प्रकारे विविध गुणधर्मांसाठी कारणीभूत ठरतात, याविषयी संशोधन प्रकाशित केले आहे. त्यामुळे विविध गुणधर्मयुक्त जातींचा विकास करणे सोपे होणार आहे. सध्या स्पीड ब्रिडींग या तंत्रज्ञानावर जॉन इनस् सेंटरमधील ग्लासहाऊसमध्ये काम सुरू असून, त्यामुळे पैदाशीची साखळी कमी करणे शक्य होईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com