agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, REARING OF SEA FISH VARIETIES | Agrowon

सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र विकसित
वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन संस्थेने आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर (हामूर) आणि पिंक इअर इंपिरर या मागणी असणाऱ्या माशांच्या बीजोत्पादनाचे तंत्र विकसित केले आहे. या अगोदर या संशोधन संस्थेने कोबिया आणि सिल्व्हर पोंपाना या माशांच्या बीजोत्पादनाचे तंत्र विकसित केले होते. आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर आणि पिंक इअर इंपिरर या माशांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर माशाच्या बीजोत्पादन आणि हॅचरी विकसित करण्याचे काम विशाखापट्ट्ण येथील प्रादेशिक संशोधन केंद्र तर पिंक इअर इंपिरर या माशाच्या बीजोत्पादनाचे तंत्र विझिजम येथील संशोधन केंद्राने केले आहे.

कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन संस्थेने आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर (हामूर) आणि पिंक इअर इंपिरर या मागणी असणाऱ्या माशांच्या बीजोत्पादनाचे तंत्र विकसित केले आहे. या अगोदर या संशोधन संस्थेने कोबिया आणि सिल्व्हर पोंपाना या माशांच्या बीजोत्पादनाचे तंत्र विकसित केले होते. आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर आणि पिंक इअर इंपिरर या माशांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर माशाच्या बीजोत्पादन आणि हॅचरी विकसित करण्याचे काम विशाखापट्ट्ण येथील प्रादेशिक संशोधन केंद्र तर पिंक इअर इंपिरर या माशाच्या बीजोत्पादनाचे तंत्र विझिजम येथील संशोधन केंद्राने केले आहे.

जागतिक मासळी बाजारामध्ये आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर (हॅमूर) या माशाला चांगली मागणी असते. गेल्या दोन वर्षांपासून संशोधन संस्थेतील तज्ज्ञ हॅचरीमध्ये बीजोत्पादन कसे यशस्वी करता येईल, याबाबत संशोधन करीत होते. सन २०१४ मध्ये बीजोत्पादनाचे तंत्र चांगल्या प्रकारे विकसित झाले; परंतु मत्यबीज जगण्याचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे तज्ज्ञांनी हॅचरीमधील पाणी व्यवस्थापन, माशांचे खाद्य व्यवस्थापनात सुधारणा करत चांगल्या क्षमतेचे मत्स्यबीज निर्मितीत यश मिळविले. चांगल्या गुणवत्तेचे हे मत्स्यबीज पुढील वाढीच्या टप्प्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण टाक्यांमध्ये ठेवले जाणार आहे. हॅचरी तंत्रज्ञान आणि पिंजरा पद्धतीने माशांच्या संगोपनाचे तंत्र मासेमारी करणाऱ्यांना येत्या काळात फायदेशीर ठरणार आहे.

या दोन्ही माशांची प्रतिकारशक्ती चांगली आहे; तसेच या माशाचे वजनदेखील चांगले असते. वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे या माशाला प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. चीन, सिंगापूर, मलेशिया या देशांत या माशांची चांगली बाजारपेठ विकसित झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...