agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, rugose white fly in coconut | Agrowon

नारळावर रूगोज चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव
डॉ. संतोष वानखेडे, डॉ. आनंद नरंगळकर
रविवार, 30 डिसेंबर 2018

सध्या कोकणपट्टीमध्ये नारळावर रूगोज चक्राकार पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

प्रसार:
वारा, मनुष्य, पक्षी तसेच फळे वाहतुकीमुळे होतो.

ओळखः

सध्या कोकणपट्टीमध्ये नारळावर रूगोज चक्राकार पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

प्रसार:
वारा, मनुष्य, पक्षी तसेच फळे वाहतुकीमुळे होतो.

ओळखः

  • ही रस शोषण करणारी कीड आहे.
  • माशीच्या पंख्याच्या जोडीवर फिकट तपकिरी पट्टे असतात. डोळे राखाडी असतात. नर आकाराने मादीपेक्षा लहान असतो.
  • अंडी लंबवर्तुळाकार, पिवळसर रंगाची असून ती चक्राकार घातलेली असतात. मेणचट पांढरट आवरणाने झाकलेली असतात.

किडीचा जीवनक्रम:
-प्रौढ माशी साधारणतः ३२ अंडी देते. अंडीवस्था ७ दिवसांची असते. पिल्ले १२-१४ दिवस तर प्रौढ १३ ते २२ दिवस जगतात.

नुकसानीची पद्धत ः
१) पिल्ले आणि प्रौढ कीड पानाच्या खालील बाजूस रस शोषून करते. त्यामुळे पानांमध्ये तणाव निर्माण होऊन त्यातील पाणी व अन्नद्रव्य उत्सर्जित होतात.
२) माशी शरीरातून गोड चिकट स्राव सोडत असल्यामुळे मुंग्या आकर्षित होतात. मुंग्यामुळे स्राव सर्वत्र पानावर पसरतो. त्यावर काळ्या बुरशीची वाढ दिसते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो.
३) प्रादुर्भाव वाढल्यास फळांवर सुद्धा अंडी आणि प्रौढ दिसतात.
४) किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम होतो.

प्रादुर्भाव ओळखण्याच्‍या पद्धती :
अपरिपक्व झावळ्यांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. त्याऐवजी खालील विशेष लक्षणे व बाबींकडे लक्ष द्यावे.
पानाच्या खालील बाजूस चक्राकार अंडी आढळणे.
पानांवर काळ्या बुरशीची वाढ दिसून येणे.
मेणासारख्या चिकट आवरणात पिले आणि प्रौढ पानाच्या खालील बाजूस दिसून येणे.

प्रादुर्भावाची तीव्रता ः
एका पानावर १० पेक्षा कमी चक्राकार अंडी - कमी प्रादुर्भाव
एका पानावर १० ते २० पेक्षा जास्त चक्राकार अंडी - मध्यम प्रादुर्भाव
एका पानावर २० पेक्षा जास्त चक्राकार अंडी - जास्त प्रादुर्भाव

नियंत्रण व्यवस्थापन ः
१) प्रादुर्भावित रोपे, फळे व शहाळ्याची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करू नये.
२) बागेचे नियमित सर्वेक्षण करावे. बागेत क्रायसोपा, ढालकिडा, मॅलाडा, इनकार्सिया या परोपजीवी मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
३) ज्या क्षेत्रामध्ये इनकार्सिया या परोपजीवी कीटक दिसून येतात अशा क्षेत्रातून ते गोळा करून प्रादुर्भावित बागेत सोडावेत.
४) बागेत झाडाच्या शेंड्याकडे पिवळे चिकट सापळे लावावेत.
५) पानावरील काळ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी १ टक्का स्टार्च द्रावण (१ ग्रॅम स्टार्च प्रतिलिटर पाणी) फवारावे. या फवारणीमुळे पानावर वाढलेल्या काळ्या बुरशीचे पापुद्रे कडक होऊन पानावरून निघतात.

रासायनिक नियंत्रण ः प्रतिलिटर पाणी
इमिडॅकलोप्रिड (१७.८ टक्के एसएल) ०.३ मिलि

-----------------
संपर्क ः डॉ. संतोष वानखेडे, ९७६५५४१३२२
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर कृषी सल्ला
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
शास्त्रीय पद्धतीनेच व्हावेत जल...गावातील पाण्याचे स्रोत ज्या भागात आहेत, त्या...
शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार...हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता...
कोरडवाहू शेतीतील समस्या जाणून...राज्यात एकूण शेत जमिनीपैकी १८ टक्के जमीन बागायत...
कांदा व लसूण व्यवस्थापन सल्लारांगडा कांद्याची काढणी झालेली असून, रब्बी...
उसाच्या जोमदार वाढीसाठी गंधक फायदेशीरनत्र, स्फुरद आणि पालाशच्या जोडीला गंधकाच्या...
जिवाणू खत वापरायचे की जिवाणूंचे अन्न...अलीकडे रासायनिक खतांच्या वापरासोबतच जिवाणू...
पीक सल्ला : सूर्यफूल, कांदा, मका, लसूण...सूर्यफूल ः पीक ११० दिवसांमध्ये तयार होते. पाने,...
सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे...सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे जमिनीच्या...
जैविक कीड रोग नियंत्रणासाठी भू...एकात्मिक कीड नियंत्रणाच्या अनेक पद्धती असल्या तरी...
लक्षात घ्या विभागनिहाय परिस्थिती...जमीन आणि पावसाचा विचार करता एकाच जिल्ह्यात...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन...रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून,...