agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Seagrass meadows in Guam have decreased by २२ percent, new analysis shows | Agrowon

सागरी मिडोव गवतामध्ये २२ टक्क्यांनी घट
वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

सामान्यत बदलत्या वातावरणामुळे माणसे किंवा सजीव स्थलांतर करू शकतात. ती सोय वनस्पतींना नाही. गेल्या काही वर्षामध्ये बदलत्या वातावणाचा फटका गुयाम येथील समुद्री गवताला (मिडोव) बसत असल्याचे संशोधनामध्ये दिसून आले. अमेरिकन विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाने केलेल्या विश्लेषणामध्ये मिडोव हे समुद्री गवत २२ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन मरीन अॅंड फ्रेशवॉटर रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे.

सामान्यत बदलत्या वातावरणामुळे माणसे किंवा सजीव स्थलांतर करू शकतात. ती सोय वनस्पतींना नाही. गेल्या काही वर्षामध्ये बदलत्या वातावणाचा फटका गुयाम येथील समुद्री गवताला (मिडोव) बसत असल्याचे संशोधनामध्ये दिसून आले. अमेरिकन विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाने केलेल्या विश्लेषणामध्ये मिडोव हे समुद्री गवत २२ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन मरीन अॅंड फ्रेशवॉटर रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे.

अमेरिकन विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. किहो किम आणि त्यांचे विद्यार्थी कार्ले के. लारोचे यांनी मारियाना या बेटावरील मोठ्या संख्येने असलेल्या समुद्री गवताचा (शा. नाव - Enhalus acoroides ) अभ्यास केला. २००४ ते २०१५ या काळात या गवतांची संख्या २२ टक्क्याने कमी झाल्याचे आढळले आहे. ही गवते निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या गवतामध्ये सेंद्रिय कर्बाचा साठवणूक ( सुमारे १० टक्केपर्यंत) होते. यातील सेंद्रिय कर्बाचा फायदा सागराप्रमाणे किनाऱ्यावरील जमिनीलाही होतो. त्याचप्रमाणे मिडोव हे गवत सागरी पर्यावरणातील अन्नसाखळीमध्ये अनेक जलचरांचे खाद्य आहे.
पॅसिफिकच्या पश्चिमेकडील उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये या गवताची व्याप्ती व त्यांचा झालेला ऱ्हास यांचे प्रत्यक्ष नोंदी व उपग्रह यांच्या साह्याने मोजमाप करण्यात आले.

  • १८७९ ते २००६ या काळात जागतिक पातळीवर सागरी मिडोव यांचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले आहे.
  • अनेक संशोधनातून १९९० नंतर मिडोव गवत नष्ट होण्याचा वेग वाढला आहे. त्यामागे सागरी किनाऱ्यावरील विकास, विविधकामे आणि पाण्याचा दर्जा ढासळणे ही प्रमुख कारणे दिली जातात.
  • अमेरिकेतील ईशान्येचा भाग, मेक्सिकोच्या खाड्या अशा काही भागांच्या तुलनेमध्ये गुयाम येथील परिस्थिती चांगली होती. मात्र, सागरी किनाऱ्यांवर माणसांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे.

हे गवत का महत्त्वाचे आहे?
मिडोव गवत विविध जलचरांच्या खाद्य साखळीचा हिस्सा आहेत. कार्बनच्या साठवणीचे प्रमाणही अधिक असल्याने एकूण पर्यावरणामध्ये मोलाची भूमिका निभावतता. मध्ये असून, देशातील अनेक बेटांप्रमाणे गुयाम मध्येही सागरी पाण्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः सांडपाणी व नत्र (नायट्रोजन) घटकांचे प्रदूषण वाढत आहे. सांडपाण्याचे निकष हे सरकारी नियम पाळले जात नसल्याचा फटका सागरी गवतांना बसत आहे.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...