agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, SOIL HEALTH WITH COFFY BERRY | Agrowon

माती संवर्धनासोबत कॉफी बेरीचे नुकसान टाळणे शक्य
वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

कॉफीच्या काढणीसाठी मोठ्या यंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे जमीन घट्ट होत राहतात. त्याचप्रमाणे २० टक्क्यांपर्यंत कॉफी बेरी खाली पडून नुकसान होते. हे दोन्ही नुकसान टाळण्यासाठी संशोधकांनी उत्तम शोधण्याचा प्रयत्न केला आहे. सबसॉयलरनंतर क्रशरचा वापर केल्याने कॉफी बेरींचे नुकसान कमी होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

कॉफीच्या काढणीसाठी मोठ्या यंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे जमीन घट्ट होत राहतात. त्याचप्रमाणे २० टक्क्यांपर्यंत कॉफी बेरी खाली पडून नुकसान होते. हे दोन्ही नुकसान टाळण्यासाठी संशोधकांनी उत्तम शोधण्याचा प्रयत्न केला आहे. सबसॉयलरनंतर क्रशरचा वापर केल्याने कॉफी बेरींचे नुकसान कमी होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

कॉफी हे ब्राझील येथील सर्वांत मोठ्या क्षेत्रावर घेतले जाणारे पीक आहे. येथील अनुकूल वातावरणामुळे कॉफी बिया पक्व होण्याचा कालावधी सर्व बागांसाठी काही आठवड्यांमध्ये येतो. परिणामी काढणीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने यांत्रिक पद्धतीने काढणीचा पर्याय बहुतांश सर्व शेतकरी अवलंबतात. मात्र, वाढत्या यांत्रिकीकरणामुळे सुलभता वाढली असली तरी काही समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यावर मात करण्यासाठी ब्राझील येथील सावो पावलो राज्य विद्यापीठातील कृषिशास्त्र तज्ज्ञ तियागो डी ओलिवेरा तॅव्हेरास व सहकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले.

समस्या

  • काढणीदरम्यान २० टक्क्यांपर्यंत कॉफी बेरी जमिनीवर पडून खराब होतात. यात यांत्रिक अकार्यक्षमतेसोबतच पाऊस, वारा, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अशा कारणांचा समावेश असतो. या खाली पडलेल्या बिया यांत्रिक पद्धतीने झाडून गोळा केल्या जातात.
  • काढणीसह वरील कारणांसाठी वापरल्या जाणारी यंत्रे ही वजनाने जड असल्याने माती घट्ट होते. त्याचा विपरीत परिणाम झाडांच्या मुळ्यांच्या वाढीवर होतो. यावर पर्याय म्हणून उत्पादक घट्ट जमीन मोकळी करण्यासाठी सबसॉयलिंग केले जाते. यात ट्रॅक्टरच्या मागे लांब पात्यांच्या साह्याने माती मोकळी केली जाते. मात्र, यात सपाट जमिनीची वासलात लागते. अशा जमिनीवरून काढणी यंत्र चालताना खाली- वर चालत असल्याने काढणी योग्य प्रकारे होत नाही.
  • या दोन्ही कारणामुळे माती मऊ राखण्यासाठी मशागतीमध्ये आणखी वाढ होते. उदा. मातीची मोठी ढेकळे फोडण्यासाठी कुळवणी करावी लागते.

उपाययोजना ः

  • या समस्यावर मात करण्यासाठी तॅवेरास व गटाने विविध तंत्रावर काम करून त्यातील सर्वोत्तम पर्याय मिळवला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मातीच्या व्यवस्थापनासाठी चार पर्यायावर काम केले.
  • नियंत्रित गटामध्ये कोणतेही व्यवस्थापन केले नाही. यामुळे यंत्राच्या चालण्यासाठी योग्य स्थिती असली तरी पिकाच्या दृष्टीने फारशी समाधानकारक स्थिती राहत नाही.
  • कुळवणीनंतर सबसॉयलिंग करणे. संशोधकांना कुळवणीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यानंतर सबलॉयलिंग करावे लागत असल्याने खर्चामध्ये वाढ होते.
  • सबसॉयलर, कुळवणी आणि क्रशर वापर. ही प्रक्रियाही सातत्यपू्र्ण कार्यक्षम ठरत नाही; तसेच एक पायरी वाढल्याने खर्चामध्ये वाढ होते.
  • सबसॉयलरचा क्रशर नंतर वापर. ही पर्याय सर्वात उत्तम असल्याचे संशोधकांना आढळले. यातून कॉफी काढणीतील नुकसान कमी होते. कामातही सुलभता मिळते.
  • जमिनीवर पडलेल्या कॉफी बेरी तशाच पडू देणे, हा काही चांगला पर्याय नाही. अशा खाली पडलेल्या कॉफी बियातून कॉफी बागांमधील दुसऱ्या क्रमांकाची कीड कॉफी बोरर या किडींची पैदास वाढते. त्याचप्रमाणे खाली पडलेल्या बियांनाही बऱ्यापैकी दर मिळत असल्याने त्या मिळवणे फायद्याचाच सौदा ठरत असल्याचे तॅव्हेरास यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...