agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Soy natural- Genetic resistance against aphids | Agrowon

सोयाबीनमधील मावा कीड प्रतिकारक जनुक गट ओळखला
वृत्तसेवा
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

दरवर्षी सोयाबीन पिकावर होणाऱ्या मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे अब्जावधी डॉलरचे नुकसान होते. या किडीच्या प्रतिकारकतेशी जोडलेल्या सोयाबीनमधील जनुकांच्या गटाचा शोध संशोधकांनी घेतला आहे. असे गट असलेल्या अनेक सोयाबीन जाती असून, त्यांचा उपयोग मावा किडीसाठी प्रतिकारक जाती विकसित करण्यासाठी होऊ शकतो.

दरवर्षी सोयाबीन पिकावर होणाऱ्या मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे अब्जावधी डॉलरचे नुकसान होते. या किडीच्या प्रतिकारकतेशी जोडलेल्या सोयाबीनमधील जनुकांच्या गटाचा शोध संशोधकांनी घेतला आहे. असे गट असलेल्या अनेक सोयाबीन जाती असून, त्यांचा उपयोग मावा किडीसाठी प्रतिकारक जाती विकसित करण्यासाठी होऊ शकतो.

आकाराने लहान असलेली मावा ही कीड वायव्येकडील अमेरिकन राज्यांमध्ये सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान करते. त्याविषयी माहिती देताना मिन्निसोटा विद्यापीठातील कृषी विद्या आणि वनस्पती जनुक तज्ज्ञ अॅरोन लॉरेन्झ यांनी सांगितले, की मावा किडीला प्रतिकार करण्याची मूलद्रव्यीय यंत्रणा सोयाबीनमध्ये अंतर्भूत असून, जनुकीय पातळीवर तिचा शोध घेण्यात आला. सध्या प्रचलित व लागवडीखाली असलेल्या व्यावसायिक जातींमध्ये हा गुणधर्म फारसा दिसून येत नाही.

सध्या मावा किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा वापर होतो. मात्र, सातत्याने होत असलेल्या कीडनाशकांच्या फवारण्यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिकारक्षमता विकसित होत आहे. त्याचप्रमाणे कीडनाशकांच्या अतिरिक्त वापराचे पर्यावरणावरही विपरित परिणाम होतात. भविष्यात कीडनाशकांच्या वापरावरही मर्यादा येत जाणार आहेत. अशा वेळी पर्याय म्हणून नावीन्यपूर्ण तंत्राचा-वनस्पतीतील प्रतिकारक्षमतेचा वापर करणे आवश्यक ठरणार आहे.

असे झाले संशोधन

  • सोयाबीन मावा ही कीड जनुकीय विविधता असलेली प्रजाती आहे. ती वनस्पतीतील प्रतिकारक्षमतेवर त्वरित मात करण्याची क्षमता मिळवू शकते. त्यामुळे अद्याप फारसा ज्ञात नसलेल्या प्रतिकार जनुकांचा शोध संशोधक लॉरेन्झ आणि सहकारी घेत होते. त्यासाठी त्यांनी सोयाबीनच्या हजारो जातींच्या चाचण्या घेतल्या. त्यातील जनुक माहिती विशेषतः मावा प्रतिकारकतेसंदर्भात कार्य करणाऱ्या जनुकांचा गट मिळण्यात आले.
  • जनुकांच्या या लहान भागाला (स्मॉल जेनेटिक लॅण्डमार्क) एसएनपीज म्हटले जाते. प्रतिकारकतेसंबंधी असे भाग जास्तीत जास्त सोयाबीन जातींमध्ये शोधण्यात आले. त्यांच्या कार्यपद्धतींचे संख्याशास्त्रीय प्रारुपाद्वारे विश्लेषण करण्यात आले.
  • लॉरेन्झ आणि सहकाऱ्यांना प्रचलित मावा प्रतिकारक सोयाबीन जातींमध्ये असे एसएनपीज आढळले. यातील अनेक विभाग हे पूर्वी मावा प्रतिकारकतेसाठी ओळखले जात नव्हते. या घटकांचा योग्य वापर करून मावा किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिकारक्षम सोयाबीन जाती विकसित करणे शक्य होणार आहे.
  • या जाती केवळ एका जनुकांऐवजी एक गटावर आधारीत असल्याने त्याविषयी प्रतिकारकता विकसित करणे मावा किडीसाठी अवघड होणार आहे.
  • असे विभाग अनेक सोयाबीन जातींमध्ये आढळले असून, त्यांचा उपयोग नव्या जातींच्या पैदाशीसाठी करणे शक्य होईल.
  • हे संशोधन दी प्लॅंट जिनोममध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...