agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Sugar pills relieve pain for chronic pain patients | Agrowon

साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमी
वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

वाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अनेक आजारांमुळे साखरेकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन गढूळ झाला आहे. मात्र, तीव्र वेदनादायक आजारांमध्ये साखरेच्या गोळ्या वेदनाशामक म्हणून काम करत असल्याचा नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. मेंदूची संरचना आणि मानसशास्त्र यावर आधारित या अभ्यासामध्ये सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांइतक्याच कार्यक्षमपणे वेदना कमी करण्याचे काम साखरेच्या गोळ्या करत असल्याचे त्यांचे मत आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले.

वाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अनेक आजारांमुळे साखरेकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन गढूळ झाला आहे. मात्र, तीव्र वेदनादायक आजारांमध्ये साखरेच्या गोळ्या वेदनाशामक म्हणून काम करत असल्याचा नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. मेंदूची संरचना आणि मानसशास्त्र यावर आधारित या अभ्यासामध्ये सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांइतक्याच कार्यक्षमपणे वेदना कमी करण्याचे काम साखरेच्या गोळ्या करत असल्याचे त्यांचे मत आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले.

विविध औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी सारख्याच दिसणाऱ्या पण अजिबात मूळ औषधांचे गुणधर्म नसलेल्या गोळ्यांचा वापर केला जातो. मात्र, केवळ आपण औषध घेत असल्याच्या मानसिक विचारानेही शरीर त्या खोट्या गोळ्यांनाही प्रतिसाद देते. या परिणामाला इंग्रजीमध्ये ‘प्लासिबो इफेक्ट’ असे म्हणतात. याच परिणामांचा नेमका अभ्यास नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील फेईनबर्ग औषधशास्त्र विद्यालयातील संशोधकांनी केला असून, त्याला मेंदूची संरचना आणि मानसशास्त्रीय गुणधर्मांची जोड देण्यात आली आहे. त्याविषयी माहिती देताना मानसशास्त्राचे प्रा. ए. वनिया अपकारिअन यांनी सांगितले, की माणसाचा मेंदू हा प्रतिक्रिया देण्यासाठी बनलेला आहे. प्रत्येकामध्ये जीवशास्त्र आणि मानसशास्त्राची एक स्थिती तयार होते. केवळ याने वेदना कमी होणार आहेत, असे म्हटल्यानेही रुग्णांना वेदना कमी होऊन चांगले वाटू लागते. रुग्णांना साखरेच्या गोळ्या देताना फसवण्याची गरज नाही. गोळ्याचे शरीरावर कोणतेही परिणाम होणार नसले तरी मेंदू या गोळ्यांना चांगला प्रतिसाद देईल. हे अशास्त्रीय नाही, कारण प्लासिबो मागेही जीवशास्त्रीय तथ्ये आहेत.

साखरेच्या गोळ्यांचे तीन फायदे आहेत.

  • परिणाम जर सारखेच मिळत असतील, तर कार्यक्षम घटक असलेल्या औषधांच्या तुलनेमध्ये प्लासिबो गोळ्या देणे अधिक फायदेशीर आहे. यातून दीर्घकाळ सातत्यपूर्ण गोळ्या खाण्यातून उद्भवणारे साइड इफेक्ट्स टाळता येतात.
  • औषधांच्या चाचण्यातून प्लासिबो परिणाम कमी करणे. सध्या औषधांच्या चाचण्यासाठी प्लासिबो इफेक्ट पद्धतीने गोळ्या दिल्या जातात.
  • अनेक आजारांमध्ये पुढे केवळ वेदनाशामक औषधांचा वापर होतो. या औषधांचा खर्चही मोठा असतो. तो टाळता येऊ शकतो.

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...