agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Sweet potato promo gets boost with another pact | Agrowon

रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राशी करार
वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या सहकार्याने ओडिशा राज्यामध्ये रताळ्याचा लागवडीला चालना देण्याच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. हाच कार्यक्रम राज्यातील अन्य चार जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठी ओरिसा शासनाच्या वतीने कृषिमंत्री प्रदीप महारथी यांनी आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे संचालक जुर्गन क्रोशिल यांच्याशी नुकताच एक करार केला.

पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या सहकार्याने ओडिशा राज्यामध्ये रताळ्याचा लागवडीला चालना देण्याच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. हाच कार्यक्रम राज्यातील अन्य चार जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठी ओरिसा शासनाच्या वतीने कृषिमंत्री प्रदीप महारथी यांनी आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे संचालक जुर्गन क्रोशिल यांच्याशी नुकताच एक करार केला.

रताळे उत्पादनामध्ये ओडिशा हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असून, प्रतिवर्ष सरासरी ४ लाख टन उत्पादन मिळते. या पिकामध्ये पोषकतेच्या दृष्टीने सुधारणा व लागवड व्यवस्थापनातील बदलांसाठी गेन्स या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. रताळे पिकातील उत्पन्न आणि पोषकता निर्मितीसाठी सुधारणा (GAINS) असे या प्रकल्पाचे नाव असून, त्याचा पहिला टप्पा २०१३ ते २०१७ या कालावधीमध्ये ओडिसा राज्यातील धेनकनाल, गंजाम आणि कोरापूत या तीन जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला. पुढील टप्प्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गंत २०१८ ते २०२१ या तीन वर्षांसाठी केओनझार, गजपती, अंगूल आणि रायागाडा या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार असून, त्यासाठी ८.४६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून रताळे लागवड १६२५ हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पाविषयी माहिती देताना फळबाग संचालक बिजय केतन उपाध्याय यांनी सांगितले, की या प्रकल्पामध्ये पारंपरिक पांढऱ्या किंवा पिवळ्या गराच्या ऐवजी अ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असलेल्या भगव्या गराच्या रताळे लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उत्पादनासह मूल्यवर्धन या बाबीवर प्रामुख्याने भर दिला जात असून, त्यातून गरीब शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि पोषकता सुरक्षेला मदत होणार आहे.

  • गेन्स प्रकल्प १ मध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या सुधारित रताळे जातीतून चांगले उत्पादन मिळाले असून, शेतकऱ्यांचा प्रतिसादही चांगला होता. चांगल्या उत्पादनामुळे या जिल्ह्यातील रोपवाटिकेतूनही रोपांची उपलब्धता वाढली.
  • या रताळ्याची मागणी वाढवण्यासाठी महिला आणि बालकांवर लक्ष केंद्रित केले असून, प्रसारासाठी काही कार्यक्रमांची आखणी केली आहे. यातील उच्च पोषक घटकांचा विचार करता शाळेतील माध्यान्ह भोजन योजनेमध्ये रताळ्याच्या पदार्थांचा समावेश करण्याचे घाटत आहे.
  • उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रताळे काढणी आणि अल्प पातळीवरील प्रक्रिया (उदा. चिप्स, पीठनिर्मिती) यंत्राच्या विकास व वापर यासाठी व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...