agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Transferring Sorghum’s Weed-Killing Power to Rice | Agrowon

ज्वारीचे तणरोधक गुणधर्म भातामध्ये आणण्यात यश
वृत्तसेवा
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

ज्वारी पिकामध्ये तणांशी सामना करण्यासाठी उत्सर्जित केल्या जाणाऱ्या रसायनांची निर्मिती अन्य भातासारख्या पिकातही करण्यात अमेरिकी कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांना यश आले आहे. यामुळे तणांचा प्रादुर्भाव असतानाही पिकाची चांगली वाढ होऊ शकणार आहे. या तंत्रज्ञानाचे पाच पेटंट घेण्यात आले आहेत.

ज्वारी पिकामध्ये तणांशी सामना करण्यासाठी उत्सर्जित केल्या जाणाऱ्या रसायनांची निर्मिती अन्य भातासारख्या पिकातही करण्यात अमेरिकी कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांना यश आले आहे. यामुळे तणांचा प्रादुर्भाव असतानाही पिकाची चांगली वाढ होऊ शकणार आहे. या तंत्रज्ञानाचे पाच पेटंट घेण्यात आले आहेत.

तणे किंवा अन्य वनस्पतींना प्रतिसाद देण्याची प्रत्येक वनस्पतींची वेगळी पद्धत असते. ज्वारी पीक हे तणांशी सामना करण्यासाठी विशिष्ट रसायन (सोर्गोलिवन) उत्सर्जित करते. या रसायनामुळे तणाने प्रादुर्भावित असलेल्या जमिनीमध्ये ज्वारी ज्या प्रकारे वाढते, त्या तुलनेत अन्य पिकांच्या वाढीवर मर्यादा येतात. पिकांची फेरपालट करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होते. अमेरिकी कृषी संशोधन संस्थेच्या ऑक्सफर्ड, मिसीसिपी येथील ‘नॅचरल प्रोडक्ट युटिलायझेशन रिसर्च युनिट’ (NPURU) येथे ज्वारी या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माचा अभ्यास करण्यात येत असून, हे गुणधर्म अन्य पिकांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला. त्याचा उपयोग जैविक तणनाशकाप्रमाणे होऊ शकतो. अन्य पिकांमध्ये सोर्गोलिवन हे रसायन तयार झाल्यास, तणांशी सामना करणे शक्य होणार असल्याचे एनपीयूआरयू येथील मूलद्रव्यीय जीवशास्त्रज्ञ स्कॉट बेअर्सन यांनी सांगितले.

या संशोधनापूर्वी सोर्गोलिवन निर्मिती करणाऱ्या जनुकांविषयी फारसे माहीत नव्हते. एनपीयूआरयू येथील बेअर्सन आणि झिक्विंयांग पॅन यांचा समावेश असलेल्या संशोधकांच्या गटाने या विषयावर काम केले. त्यांना सोर्गोलिवन हे संयुग भातामध्ये टाकण्यात यश आले आहे. हे संशोधन ‘न्यू फायटोलॉजिस्ट’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

या संशोधनाचे दुहेरी फायदे आहेत.
१. सोर्गोलिवन असलेल्या पिकांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करण्याची आवश्यकता कमी होईल. पर्यायाने शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल.
२. नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या या रसायनामुळे पर्यावरणाला हानी पोचणार नाही.

  • प्राथमिक अभ्यासामध्ये संशोधकांना ज्वारी पिकांमध्ये सोर्गोलिवनचे प्रमाण यशस्वीरीत्या वाढवले आहे. या वाढलेल्या तण नियंत्रक घटकांमुळे तणांसाठी प्रतिकारकता वाढली आहे.
  • त्याच प्रमाणे ज्वारीतील सोर्गोलिवन निर्मिती रोखण्यातही यश मिळवले आहे. त्यामुळे ज्वारीसोबत अन्य आंतरपिकांचाही फेरपालट करणे भविष्यात शक्य होईल.
  • प्रयोगशाळेत सोर्गोलिवन निर्मितीची प्रक्रिया भातामध्येही घडवून आणली आहे. त्यामुळे ज्वारीप्रमाणेच भातामध्येगी तणांशी सामना करण्याची क्षमता वाढणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...