agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Turning marginal farmlands into a win for farmers and ecosystems | Agrowon

क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणेत गवतवर्गीय पिके महत्त्वाची
वृत्तसेवा
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

अनेक शेतामध्ये पुरस्थितीमुळे पाणी शिरते किंवा काही जमिनीमध्ये जलधारणक्षमता कमी असल्यामुळे किंवा पोषक घटक उपलब्ध नाहीत किंवा अतिरिक्त क्षार आहेत, या कारणांमुळे अशा जमिनीमध्ये पिकांचे उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येतात. अशा शेतांमध्ये गवतवर्गीय जैवइंधन पिकांचे उत्पादन घेतल्यास अधिक फायदेशीर राहू शकेल, असे मत ‘जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका’च्या वार्षिक बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या संशोधनात व्यक्त केले आहे.

अनेक शेतामध्ये पुरस्थितीमुळे पाणी शिरते किंवा काही जमिनीमध्ये जलधारणक्षमता कमी असल्यामुळे किंवा पोषक घटक उपलब्ध नाहीत किंवा अतिरिक्त क्षार आहेत, या कारणांमुळे अशा जमिनीमध्ये पिकांचे उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येतात. अशा शेतांमध्ये गवतवर्गीय जैवइंधन पिकांचे उत्पादन घेतल्यास अधिक फायदेशीर राहू शकेल, असे मत ‘जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका’च्या वार्षिक बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या संशोधनात व्यक्त केले आहे.

२०११ पासून अॅरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधक श्रब विलो आणि स्विचग्रास या गवतवर्गीय वनस्पतींवर संशोधन करत आहेत. वालुकामय जमिनीमध्ये त्यांच्या वाढीच्या प्रयोगामध्ये मातीची केवळ धूपच थांबत नाही, तर मातीतील अतिरिक्त क्षारयुक्त घटक ही पिके शोषून घेत असल्याचे दिसून आले आहे. अतिरिक्त क्षारामुळे खराब झालेल्या जमिनीमध्येही यांची वाढ बऱ्यापैकी होते. पावसाच्या वाहत्या पाण्यासोबत हे क्षार भूजलामध्ये किंवा पाण्याच्या स्रोतामध्ये प्रदूषणाचे कारण ठरतात. मेक्सिकोच्या खाडीमध्ये पाण्यामध्ये प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात शेवाळ वाढल्यामुळे विषारी डेड झोन तयार झालेले आहेत. अशा डेड झोनमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे जलचर राहू शकत नाहीत.
लेमॉँट (इल्लिनॉइज) येथील अॅरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधक जॉन क्विन यांनी सांगितले, की पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने आम्ही झुडूप विलो आणि गवतांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, अभ्यासाअंती आम्हाला या पिकांमध्ये अनेक संभाव्य क्षमता दिसून आल्या. त्यात प्रामुख्याने जैवइंधनासाठी बायोमास, परागीभवन करणाऱ्या कीटकांसाठी, अन्य वन्यजीवांसाठी योग्य रहिवास यांचा समावेश होतो.

प्रयोग

  • मध्य पूर्व इल्लिनॉइज येथील ६.५ हेक्टर प्रक्षेत्रावर क्रिस्टिना नेग्री यांच्या नेतृत्त्वाखाली अभ्यास करण्यात आला. हा भाग सामान्यतः कमी उत्पादकता, नायट्रेटचे उच्च प्रमाण, सातत्याने होणारी धूप यासाठी ओळखली जाते.
  • या जमिनीमध्ये श्रब विलो या गवताची लागवड जैवइंधन पीक म्हणून करण्यात आली. त्याचे माती, त्यातील ओलावा, भूजल आणि एकूण अन्य वनस्पतींवर होणारा परिणाम तपासण्यात आला. त्याचप्रमाणे मका आणि सोयाबीन पिकामध्ये वापरण्यात आलेल्या खतांचा कशाप्रकारे ऱ्हास होतो, याचीही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
  • २०१३ मध्ये लावलेल्या विलो गवतामुळे येथील भूजलातील नायट्रेट क्षारांची तीव्रता अन्य मका पिकांच्या शेताच्या तुलनेमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसले.
  • त्याचप्रमाणे त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायू, कीटकांची विविध आणि एकूण हिरवळीवर चांगले परिणाम झाल्याचे दिसून आले.
  • जमिनीच्या व्यवस्थापनातून पाण्याचा दर्जा सुधारण्याविषयीच्या या प्रकल्पासाठी अमेरिकी ऊर्जा, जैवऊर्जा विभागामार्फत अर्थसाह्य करण्यात आले आहे.

गवतवर्गीय पिकांचे फायदे ः
गवतवर्गीय पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची खोलवर जाणारी मुळे. ती मका पिकामध्ये अतिरिक्त होणाऱ्या नायट्रेट खतामध्येही तग धरू शकतात. त्यामुळे जैवइंधन पीक म्हणून त्यांची उपयुक्तता मोठी आहे. या पिकांच्या लागवडीचा खर्च अत्यंत कमी असून, जमिनीतील क्षारांचे अतिरिक्त प्रमाण कमी करणे आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या बायोमासमधून जैवइंधनाची निर्मिती शक्य आहे. त्याचप्रमाणे मका पिकांमध्ये वाढताना ते मका पिकाची स्पर्धा करत नाही. त्यामुळे शेतीखालील कोणतीही जमीन कमी न करता या पिकांखालील क्षेत्र वाढवता येते. त्याच प्रमाणे ज्या जमिनीमध्ये सामान्य पिकांचे उत्पादन घेण्यात अडचणी येतात, तिथे ही पिके चांगल्या प्रकारे वाढू शकतात. तुमची खते वाया जाऊ देत नाही. पाण्याचे प्रदूषण रोखण्यामध्ये मदत करतात, असेही अनेक फायदे असल्याचे संशोधक नेग्री यांनी सांगितले.

फोटो गॅलरी

इतर बातम्या
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...