agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Water use for fracking has risen by up to ७७० percent since २०११ | Agrowon

खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब करण्याच्या प्रमाणात वाढ
वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक भागांमध्ये २०११ ते २०१६ या काळामध्ये तेलविहिरीमध्ये फ्रॅक्चरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण ७७० टक्क्यांपर्यंत असल्याचे ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. नवीन विहिरींच्या निर्मितीसाठी पहिल्या वर्षी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण १४४० टक्क्यांनी वाढल्याचेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. या पद्धतीने फ्रॅकिंग पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत राहिल्यास सन २०३० पर्यंत वॉटर फूटप्रिंटमध्ये ५० पटीने वाढ होऊ शकते. या सर्व प्रक्रियांचा विपरीत परिणाम दुष्काळग्रस्त पश्चिमेकडील राज्यांतील भूजलावर होऊ शकतो.

अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक भागांमध्ये २०११ ते २०१६ या काळामध्ये तेलविहिरीमध्ये फ्रॅक्चरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण ७७० टक्क्यांपर्यंत असल्याचे ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. नवीन विहिरींच्या निर्मितीसाठी पहिल्या वर्षी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण १४४० टक्क्यांनी वाढल्याचेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. या पद्धतीने फ्रॅकिंग पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत राहिल्यास सन २०३० पर्यंत वॉटर फूटप्रिंटमध्ये ५० पटीने वाढ होऊ शकते. या सर्व प्रक्रियांचा विपरीत परिणाम दुष्काळग्रस्त पश्चिमेकडील राज्यांतील भूजलावर होऊ शकतो.

जमिनीमध्ये तेल काढण्यासाठी कातळ फोडण्यासाठी प्रचंड दाबाने पाणी सोडले जाते. त्याला ‘हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग’ असे म्हणतात. आजवरच्या अभ्यासामध्ये यासाठी लागणारे पाणी हे अन्य ऊर्जास्रोतांच्या तुलनेत अधिक नसल्याचे सुचवले जात होते. मात्र, हे सारे अभ्यास गेल्या काही वर्षांतील फ्रॅकिंगच्या एकूण माहितीवर आधारलेले आहेत. ड्यूक विद्यापीठातील भूरसायनशास्त्र आणि जलदर्जा विभागातील प्रा. अॅवनेर वेन्गोष यांनी सांगितले की, या अभ्यासात दशकापेक्षा अधिक काळातील फ्रॅकिंगच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून त्याचे वॉटर फूटप्रिंट वाढत गेल्याचे स्पष्ट झाले. पाणीवापराबाबत २०१४ आणि २०१५ ही वर्षे महत्त्वाची ठरतात. येथूनच पुढे पाण्याच्या वापराचा दर लक्षणीयरीत्या वाढत गेला. प्रतिविहीर खराब होणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत.

गेल्या सहा वर्षांतील पाणीवापर, नैसर्गिक वायू, तेल आणि उद्योगाद्वारे खराब करण्यात आलेले पाणी या विषयीची माहितीचे विश्लेषण केले. अमेरिकेतील शेल वायू आणि तेल उत्पादक प्रदेशातील १२ हजारपेक्षा अधिक विहिरींचा त्यात समावेश होता. त्यावरून पूर्वीचे, सध्याचे आणि भविष्यातील पाण्याचा वापर काढण्यात आला. या संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...