agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, why maleria parasites are faster than immune system | Agrowon

मलेरियाचे परजीवी मानवी प्रतिकारक पेशींपेक्षा अधिक वेगवान
वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मलेरिया रोगकारक परजीवी प्लाजमोडियममध्ये वेगळ्या असलेल्या मूलभूत कायटोस्केलेटन प्रोटीनमुळे मानवी त्वचेतील प्रतिकारक पेशींपेक्षा दहा पट अधिक वेगवान असल्याचे हेडलबर्ग इन्स्टिट्यूट फॉर थेओरेटिकल स्टडिजमध्ये झालेल्या संशोधनामध्ये आढळले आहे. परिणामी, प्रतिकारक पेशी परजीवीला रोखण्यामध्ये कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मलेरिया रोगकारक परजीवी प्लाजमोडियममध्ये वेगळ्या असलेल्या मूलभूत कायटोस्केलेटन प्रोटीनमुळे मानवी त्वचेतील प्रतिकारक पेशींपेक्षा दहा पट अधिक वेगवान असल्याचे हेडलबर्ग इन्स्टिट्यूट फॉर थेओरेटिकल स्टडिजमध्ये झालेल्या संशोधनामध्ये आढळले आहे. परिणामी, प्रतिकारक पेशी परजीवीला रोखण्यामध्ये कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजवर मलेरियाला रोखण्यामध्ये प्रतिकारक पेशी दहा पटीने कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न हेडलबर्ग इन्स्टिट्यूट फॉर थेओरेटिकल स्टडिजमधील संशोधक रॉस डग्लस आणि सहकाऱ्यांनी केला आहे. त्यामध्ये सस्तन प्राण्याच्या पेशी आणि परजीवी यांची जडणघडण वेगळ्याप्रकारे झाली असून, त्यामध्ये एक प्रथिन महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले. या संशोधनाचा फायदा उपचार प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी होणार आहे. हे ‘संशोधन जर्नल प्लॉसवन बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मलेरियाचा परजीवी वेगाने कशा हालचाली करतो?
प्रोटीन्सची लांब साखळी एकमेकांशी जोडलेली असून, त्यातून एक्टिनची लांब दोराप्रमाणे रचना तयार होते, त्याला `फिलामेंट्स` असे म्हणतात. हे फिलामेंट्स स्नायूंच्या पेशी अधिक चांगल्याप्रकारे कार्यरत राहण्यासाठी मदत करतात. त्याविषयी माहिती देताना डॉ. रॉस डग्लस यांनी सांगितले, की सर्वांत वेगवान असलेल्या प्रतिकारक पेशींच्या तुलनेत मलेरियाचा परजीवी दहापट अधिक वेगवान आहे.

सस्तन प्राण्यातील परजीवीना रोखणे होईल शक्य

  • सस्तन प्राणी आणि परजीवी यातील अॅक्टीन प्रथिनामध्ये काही भागात बदल आहेत. संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये प्रथिनांच्या संबंधित भागामध्ये सस्तन प्राण्याच्या पेशीतील संबंधित घटकांचा वापर करून पाहिला. तेव्हा परजीवीला तग धरणे शक्य झाले नसल्याचे रॉस यांनी सांगितले. त्यानंतर अधिक अभ्यासासाठी विविध प्राण्यांतील परजीवीच्या हालचालींचा प्रयोगशाळेत, संगणकीय पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
  • या संशोधनातून पुढे आलेल्या अॅक्टीन प्रोटीन्सला लक्ष्य करणाऱ्या रासायनिक संयुगांचा शोध घेता येईल. त्यातून हे फिलामेंट निर्मितीची प्रक्रिया रोखणे किंवा तोडून टाकणे शक्य होईल. त्यामुळे शरीरातील प्रतिकारक पेशींच्या हल्ल्यामध्ये परजीवी तग धरू शकणार नाहीत.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...