जैवविविधता संवर्धनासाठी शेतीपरिसरामध्ये योग्य बदल हवेत

जैवविविधता संवर्धनासाठी शेतीपरिसरामध्ये योग्य बदल हवेत
जैवविविधता संवर्धनासाठी शेतीपरिसरामध्ये योग्य बदल हवेत

जैवविविधतेमध्ये वनस्पती, सजीव, उभयचर प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. रहिवास नष्ट होत असल्याने जैवविविधतेला प्रामुख्याने फटका बसत असून, त्यासाठी वातावरणातील बदल कारणीभूत असल्याचे संशोधकांचे मत आहे. यासाठी केवळ शेतीपुरता विचार करून चालणार नाही, तर जमिनीच्या वापरामध्ये योग्य ते बदल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. या विषयी कॅलिफोर्निया-बर्केले विद्यापीठातील संशोधकांनी एक लेख सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये लिहिला आहे. तपकिरी वटवाघळांचे शरीर तळहातापेक्षा लहान असले तरी पंखाची लांबी मात्र एक फुटापेक्षा अधिक असते. ते एका रात्रीमध्ये ६ ते ८ हजार किटकांचा फडशा पाडते. यामुळे पिकातील किडींची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र, अशा वटवाघळांच्या अत्यंत अल्प प्रजाती अमेरिकेतील शेती परिसरामध्ये राहतात. याचे कारण म्हणजे एकल पिकांची शेती. अशा एकाच पिकामुळे वटवाघळांना राहण्यासाठी, घरटे करण्यासाठी योग्य अशी जागाच उपलब्ध असत नाही. जमिनीच्या वापराच्या पद्धतीमध्ये - शेते, कुरणे आणि वने यातील योग्य समन्वय राखण्याची आवश्यकता विविध संशोधनामधून सतत पुढे येत आहे. नुकत्याच प्रकाशित लेखामध्ये कॅलिफोर्निया बर्केले विद्यापीठातील पर्यावरणशास्त्रज्ञांनी याविषयी आपली मते मांडली आहेत.

  • शेतीमध्ये बांध, कोपरे किंवा विविध ठिकाणी झाडांची वाढ करणे आवश्यक आहे. त्यातून विविध पक्षी, वटवाघळे आणि किटकांना आश्रयस्थान मिळू शेकल. शेत, फळबागा, कुरणे आणि फुले येणाऱ्या वनस्पती यांचा समावेश पर्यावरणामध्ये असला पाहिजे.
  • आता केवळ जंगलाच्या बंदिस्त कुंपणामध्ये त्यांचा रहिवास अडकलेला असून, या जागाही तुलनेने कमी होत आहेत. शेती परिसरामध्ये अधिक दाट स्वरुपामध्ये रहिवास उपलब्ध झाल्यास मोठे प्राणीही त्यामध्ये राहू शकतील.
  • कॅलिफोर्निया बर्केले विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागातील संशोधिका अदिना मेरेनलेंडर यांनी सांगितले, की जैवविविधतेसाठी संरक्षित क्षेत्र असणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, केवळ त्यावर अवलंबून राहणे योग्य होणार नाही. सजीवांच्या विविध प्रजाती वेगाने नष्ट होत आहेत. तापमान आणि वातावरणातील बदलांमुळे विविध प्रजातींची स्थलांतरे वाढत जाणार आहेत, त्यांच्यासाठी अधिक योग्य वातावरण संरक्षित क्षेत्राच्या बाहेरही उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे. परिसरामध्ये नैसर्गिक स्थिती जपणे, अगदी एखादे झाडही अनेक प्रजातींसाठी आश्रयस्थान ठरू शकते.
  • गेल्या काही वर्षांमध्ये द्राक्ष शेतीसाठी मोठ्या प्रमाणात ओक झाडे आणि झुडपे नष्ट करण्यात आली. त्याचा फटका स्थानिक प्रजातींना बसत आहे. यामुळे संवेदनशील पक्षी, उभयचर प्राणी नष्ट होतील.
  • शहरी आणि कृषी क्षेत्रामध्ये राहू शकणाऱ्या उदा. मॉकिंगबर्ड, हाऊस पिंचेस, वटवाघळाच्या काही प्रजाती वाढू शकतील. मात्र, त्या प्रजाती शहरी वातावरणाला संवेदनशील आहेत उदा. अॅकॉर्न वूडपीकर्स, केशरी डोक्याचा वार्बलर्स, मोठे तपकिरी वटवाघूळ यांच्यासाठी मात्र खास उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
  • पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. क्लारे क्रेमेन यांनी सांगितले, की नैसर्गिकपणे शेती परिसराची उभारणी व राखण करावी लागणार आहे. मात्र, हे परिसर अधिक उत्पादक आणि फायदेशीर झाले पाहिजेत. आपल्या आवश्यकतेसाठी अन्न तयार करतानाच या पर्यावरणातील अन्य घटकांचाही विचार करावा लागणार आहे. जैवसाखळीतील प्रत्येक घटक आपापल्या स्थानी महत्त्वाचा आहे. तो लुप्त झाल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com