agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, World's oldest cheese found in Egyptian tomb | Agrowon

इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीज
वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

चीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते. चीजची चव वाढण्यासाठी मुद्दाम त्याचे एजिंग केले जाते. मात्र, इजिप्शियन थडग्यामध्ये नुकतेच आजवरचे सर्वात जुने घन स्वरूपातील चीज सापडले आहे. त्याविषयीची माहिती ‘एसीएस’च्या ‘जर्नल अॅनालिटकल केमिस्ट्री’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

चीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते. चीजची चव वाढण्यासाठी मुद्दाम त्याचे एजिंग केले जाते. मात्र, इजिप्शियन थडग्यामध्ये नुकतेच आजवरचे सर्वात जुने घन स्वरूपातील चीज सापडले आहे. त्याविषयीची माहिती ‘एसीएस’च्या ‘जर्नल अॅनालिटकल केमिस्ट्री’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ख्रिस्तपूर्व १३ व्या शतकामध्ये इजिप्त येथील मेम्फिस शहराचे मेयर असलेल्या पीताहमेस यांचे थडगे १८८५ मध्ये प्रथम आढळले होते. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये झालेल्या वाळूच्या वादळामुळे पुन्हा ते झाकले गेले. त्याचा पुनर्शोध २०१० मध्ये पुन्हा घेण्यात आला. या वेळी उत्खनन तज्ज्ञांना काही तुटलेली भांडी सापडली. अशाच एका भांड्यामध्ये पांढरा घट्ट काही पदार्थ होता, त्याला कापडाच्या साह्याने बांधले होते. त्याचे विश्लेषण एन्रिको ग्रेको आणि सहकाऱ्यांनी आधुनिक पद्धतीने केले. त्यातील पदार्थ दुधापासून बनलेला असून, त्यावरील कपड्याचे आवरण पातळ पदार्थापेक्षाही घट्ट पदार्थासाठी योग्य असल्याचे आढळले.

नमुन्यातील अन्य काही पेप्टाईडमध्ये ब्रुसेल्ला मेलिटेनिस या जिवाणू आढळले. या जिवाणूमुळे प्राणी आणि माणसांसाठी ब्रुकेल्लोसीस या प्राणघातक रोगाचा प्रादुर्भाव होतो. निर्जंतुक नसलेल्या डेअरी उत्पादने खाण्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्राथमिक निष्कर्षांना अधिक बळकटी आणण्यासाठी अधिक संशोधन केले जात आहेत.

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
परभणी : धरणांच्या जलाशयातील उणे...परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या...
नाशिक : पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या...अंबासन, जि. नाशिक : बागलाण परिसरातील गावागावांत...
देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटकावाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा...
वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षाअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी...
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या...मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत...
कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने...नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते...
सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः...शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण...
रत्नागिरी, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम...पुणे  : ग्राहकांची विशेष पसंती असलेल्या...
नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे...नगर ः उसासोबत ज्वारीचे आगार म्हणून ओळख असलेल्या...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत १...अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे...
यवतमाळ बाजार समितीत हळद खरेदीस प्रारंभयवतमाळ  ः जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्रात वाढ...
शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी...बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक...
पुणे बाजारात आले, टोमॅटोच्या भावात...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलंकोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं...
अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या...
जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची...जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या...
लाकडी अवजारे हद्दपार; सुतारांवर...रिसोड, जि. वाशीम ः आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू...
कसणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास...विकसनशील देशांमध्ये कृषी उत्पादकता आणि उत्पन्नाची...
जळगाव बाजार समितीती कांदा दरात सुधारणाजळगाव ः लाल कांद्याची आवक अस्थिर असून, दरात मागील...
नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन चार...नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांची चारा...