शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील रिंगणी व्याधी

शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील रिंगणी व्याधी
शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील रिंगणी व्याधी

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे बैलावर अवलंबून आहेत. आंतरपिकातील मशागत, भात शेतात माल वाहतूक व ज्या ठिकाणी ट्रॅक्‍टर किंवा इतर वाहने जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी माल वाहतूक अशी कामे बैलांच्या साहाय्याने केली जातात. गायी व म्हशीमध्ये बरेचसे आजार किंवा व्याधी या शल्कचिकित्सा संबंधित आहेत जसे की, शिंगाचा कर्करोग, डोळ्यांचा कर्करोग, खांद्यावरील ट्युमर, अस्थिभंग, जखमा इत्यादी या व्याधीपैकीच एक म्हणजे रिंगणी. जनावरांमध्ये रिंगणी व्याधी झाल्यास जनावर विकून न टाकता त्यावर वेळीच शस्त्रक्रिया करून उपचार केल्यास जनावरे पूर्ववत कामासाठी वापरता येतात.

रिंगणी म्हणजे काय?

  •  रिंगणी हे स्थानिक भाषेतील नाव आहे. याला शास्त्रीय भाषेत अपवर्ड फिक्सेशन आॅफ पटेला (Upward fixation of patella) किंवा स्ट्रींग हॉल्ट असे म्हणतात.
  •  रिंगणी हा आजार नसून व्याधी आहे.
  •  ही व्याधी हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते.
  • रिंगणी व्याधी कशी होते?

  •  रिंगणीसाठी पटेला नावाची अस्थी कारणीभूत असते.
  •  जनावरात तीन प्रकारच्या पटेला असतात त्यातील मेडिअल पटेला ताठर झाल्यास रिंगणी होते.
  •  पटेला अस्थी ही सीसमॉईड जातीची अस्थी असून ती लहान वासरांमध्ये आकाराने खूप लहान असते व वयानुसार ती हळूहळू वाढत जाते आणि विशिष्ट आकार प्राप्त केल्यानंतर त्याची वाढ थांबते.
  •  यामध्ये सांध्याची हालचाल (मागच्या पायाच्या आतील बाजूस) पटेला अस्थी ताठर झाल्यामुळे जनावराला हालचाल करताना त्रास होतो, त्यामुळे जानावर लंगडत चालते.
  • लक्षणे

  •  रिंगणीमुळे मागचा एक किंवा दोन्ही पाय बाधीत होतात.
  •  मागच्या पायाची सांध्याची हालचाल व्यवस्थित होत नाही.
  •  जनावर विश्रांतीनंतर विशेषतः सकाळी लंगडते, पण काही अंतर चालल्यानंतर चाल ही व्यवस्थित होते.
  •  पाय ताठर झाल्यामुळे कधी कधी जनावरांचे खुर जमिनीवर घासतात व त्यामुळे काही जनावरात रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो.
  •  बाधित जनावरे जमिनीवर पाय घासतात.
  •  जनावरे पायांची हालचाल झटके मारत करतात.
  •  अशा जनावरांत चारा खाणे, पाणी पिणे व्यवस्थित असते.
  • उपचार पद्धती

  •  अशा जनावरांची वेळीच पशुवैद्यकीय डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करावी. याच्या उपचारासाठी वात तोडणे (Patella Desmotomy) ही शस्त्रक्रिया केली जाते.
  •  अगदी काही वेळातच ही शस्त्रक्रिया होते आणि त्यानंतर जनावर व्यवस्थित चालू शकते आणि त्याला सांध्याची हालचाल करता येते.
  •  या शस्त्रक्रियेमध्ये मागच्या पायाच्या आतील बाजूस भूल दिली जाते आणि मेडिअल पटेला अस्थी तोडली जाते.
  •  शस्त्रक्रियेमुळे दुधाळ किंवा गाभण जनावर व काम करणाऱ्या बैलांत कोणताही विपरित परिणाम होत नाही.
  •  शस्त्रक्रियेनंतर जनावरास लगेच चालवले जाते.
  • संपर्क  ः डॉ. एस. एस. पिटलावार, ९४२३९०५८४२ (पशुशल्यचिकित्सा विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com